23.4 C
Latur
Sunday, March 8, 2026
Homeलातूरनिलंगा रोडवर ७ टन गोमांसासह वाहन जप्त

निलंगा रोडवर ७ टन गोमांसासह वाहन जप्त

किल्लारी : वार्ताहर
किल्लारी पोलीस ठाणे हद्दीत लामजना चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निलंगाकडे जाणा-या रोडवर कांही अंतरावर गोमांस वाहातुक करणारा ट्रक आसल्याचा सुगावा लागल्यावरून १.३० वाजता पोलिसांनी तो ट्रक मुद्देमालासह जप्त केला.

किल्लारी ठाण्याचे पोहेकॉ रामहारी माळी व ड्रायव्हर पोहेकॉ डि. एल. शिंदे हे पोलीस वहानातून पेट्रोलीग करीत आसताना सपोनी विशाल शहाणे यांच्या आदेशानुसार लामजना चौकातील शिवाजी महाराज पुतळ्यापासून निलंगाकडे जाणा-या रोडवर कांही अंतरावर गोमांस वहातुक करणारा ट्रक आसल्याचा सुगावा लागल्यावरून कार्यवाही करीत रात्री १.३० वाजत मुद्देमालासहीत जप्त करून पहाटे ४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. यावेळी एमएच १० झेड ५५१५ मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी किल्लारी पोलीस ठाण्यात पहाटे ४ वाजता गोमांस प्रतिबंधक अ‍ॅक्टप्रमाणे आरोपी रिजवान युनुस कुरेशी वय ३३ (२) जलील शेख दोघेही राहाणार धाराशीव यांच्यावर गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास बिटजमादार मुरली दन्तराव हे करीत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR