27.6 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरपरिश्रमाच्या बळावरच यशाचे शिखरे सर करता येतात

परिश्रमाच्या बळावरच यशाचे शिखरे सर करता येतात

निलंगा : प्रतिनिधी
परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी संघर्षाला शरण न जाता जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांच्या बळावरच यशाची शिखरे सर करता येतात. समाजाने न्यूनगंड झटकून आत्मविश्वासाने पुढे जात आदर्श निर्माण करावा, असे प्रतिपादन अ‍ॅड. विठ्ठल आदीत्य यांनी केले. निलंगा येथील शासकीय विश्रामगृहावर सकल धनगर समाजाच्या वतीने सत्कारास उत्तर देताना ते म्हणाले की, देशाच्या सर्वोच्च न्यायालयात कामकाज करण्यासाठी आवश्यक असलेली एओआर’ ही अत्यंत प्रतिष्ठेची परीक्षा उत्तीर्ण होत त्यांनी निलंगा तसेच संपूर्ण धनगर समाजाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा समाजाच्या वतीने गौरव करण्यात आला.

यश हे कुणालाही सहज मिळत नाही; त्यामागे त्याग, परिश्रम आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड असते. समाजातील तरुणांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देऊन न्यायव्यवस्था, प्रशासन, स्पर्धा परीक्षा आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवावा आहे. आपण मागे राहण्यासाठी नाही तर नेतृत्व करण्यासाठी जन्माला आलो आहोत असे सांगत समाजातील एकजूट, शिक्षणाची कास आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर कोणतीही अडचण मोठी नसते, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक व सूत्रसंचलन प्रकाश सराटे यांनी केले तर आभार झटिंग म्हेत्रे यांनी मानले.

यावेळी नगरसेवक प्रा. गजेंद्र तरंगे, अ‍ॅड. गजानन मंठाळे, शिवदास गुंजिटे, भगीरथ वरवटे, मल्हारी पेठकर, गंगाराम सूर्यवंशी, भरत म्हेत्रे, बळवंत सरवडे, बालाजी लव्हवे, सचिन दोडके, कमलमर म्हेत्रे, डॉ. बापू काळे, संजय भोसले, दीपक कात्रे, गोपीनाथ भोकरे, रोहिदास म्हेत्रे, मोहन कुदळे, संतोष घोडके, राजेंद्र हजारे, डॉ. गिरीधर सूर्यवंशी, डॉ. धनगे, मोहन सोनटक्के, लक्ष्मण म्हेत्रे, बब्रुवान सोनटक्के आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR