27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeलातूरमाजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते  ‘रेणा’च्या ४,२१,१११ व्या साखर पोत्यांचे पूजन  

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते  ‘रेणा’च्या ४,२१,१११ व्या साखर पोत्यांचे पूजन  

रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील दिलीपनगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखान्यातील गळीत हंगाम २०२५-२६ मधील उत्पादीत ४,२१,१११ व्या साखर पोत्याचे पुजन कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते व कारखान्याचे चेअरमन  अनंतराव ठाकुर देशमुख, व्हाईस चेअरमन अ‍ॅड. प्रवीण पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये  कारखान्याच्या कर्मचा-यांनी ८७ दिवसांत उत्तम गाळप केले बद्दल कौतुक केले व  कारखान्यातील कर्मचारी यांना त्रिपक्षीय करारानुसार ठरलेली  १० टक्के पगार वाढ लागू करत असल्याचे कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी जाहीर केले.
कारखान्याने विद्यमान गळीत हंगामाचे गाळप दि. १८ नोव्हेंबर २०२५ रोजी चालु झाले असुन कारखान्याने दि. १२ फेबु्रवारी २०२६ अखेर ८७ दिवसांत कार्यक्षमतेचा पुरेपुर वापर करुन ४,०७,७७५ मे. टन गाळप करुन बी हेवी  मोलसेस व सिरप इथेनॉलसह सरासरी ११.९३ टक्के साखर उता-यासह ४,२१,१११ क्विंंटल साखर उत्पादीत केली कारखान्याचे आसवाणी प्रकल्पही सुरु आहे यामध्ये ४९२४५०१  लिटर इथेनॉल उत्पादन व तसेच कारखान्याच्या सहविज निर्मिती प्रकल्पातुन ८४४८००० युनिटचे महावितरणा एक्सपोर्ट झाले असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन अनंतराव ठाकुर देशमुख यांनी दिली.
सदरील कार्यक्रमास लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक यशवंतराव पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष तथा संचालक  आबासाहेब पाटील, धनराज देशमुख, संग्राम माटेकर, तुकाराम कोल्हे, तानाजी कांबळे, शंकरराव पाटील, गोविंद पाटील, रणजित पाटील,  बालाजी हाके, श्री व सौ. वैशालीताई पंडितराव माने, श्री व सौ. अमृताताई स्नेहलराव देशमुख, तज्ज्ञ संचालक चंद्रचुड चव्हाण, नरसिंग इंगळे, कार्यलक्षी संचालक आण्णासाहेब पाटील, कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे शेतकरी सभासद व कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR