24.2 C
Latur
Tuesday, March 10, 2026
Homeलातूरशिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात

शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात

टीम एकमत
लातूर : बहूजन प्रतिपालक, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध पक्ष, संघटनांच्यावतीने जागोजागी मंचाची उभारणी करुन तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करुन जयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सवाद्य मिरवणुका, झांज पथक, ऐतिहासीक वेशभूषा, भगवे ध्वज, तरुणांचा उत्साह यामुळे परिसर भगवेमय झाला होता. या निमित्ताने व्याख्यान, रक्तदान शिबीर, अन्नदानासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जळकोटसह तालुक्यात गावोगावी उत्साह
जळकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथप्पा किडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संग्राम हासुळे पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मारुती पांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश धुळशेट्टे, नगरसेवक सचिन सिद्धेश्वरे, ओमकार धुळशेट्टे, भाजपचे ज्येष्ठ नेते सोमेश्वर सोपा, तात्या पाटील, बाळू डांगे, प्राचार्य चंद्रशेखर कळसे , सचिन भोसले , गोविंद भ्रमना , व्यंकटराव पवार,  बालाजी थोंटे,  गोविंद मंगनाळे , माजी प्राचार्य संपत शिंगाडे, नागेश कपाळे, गणेश चिखले  यांच्यासह नगरसेवक, मान्यवर उपस्थित होते . याप्रसंगी महात्मा फुले पब्लिक स्कूलच्या वतीने शाळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत विविध देखाव्यासह रॅली काढण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात विविध कलागुणांचे सादरीकरण केले.  घोणसी उमरगा रेतू, शेंलदरा, जगळपूर, हावरगा, वांजरवाडा, हळद वाढवणा, पाटोदा बुद्रुक, विराळ, माळहिप्परगा, रावणकोळा, तिरूका, ढोरसांगवी, येलदरा येथे जयंतीचा उत्साहा दिसून आला.  उदगीर जळकोट मतदारसंघाचे आमदार संजय बनसोडे यांनी शहरासह जळकोट तालुक्यात ठिकठिकाणी भेटी देऊन सहभाग नोंदवला.
घोणसी येथे आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळांत  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित गीते सादर केली. जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवाजी महाराजांचे छायाचित्र देऊन भेट देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बालाजी पाटील, सत्यवान बालासाहेब पाटील (सरपंच रावणकोळा), मंदार विचारे, मोरगे  गोपाळ महाराज आंब्रे, सत्यवान व्यंकटराव पांडे तालुकाध्यक्ष, भाजपा जळकोट, जि. प चंद्रशेखर अशोकराव पाटील ( सरपंच अतनूर), जि प सदस्य शांताबाई अदावळे, बाळासाहेब पाटोदे, रामचंद्र माधवराव अदावळे,  रामराव शिवाजी राठोड (माजी जि.प.सदस्य), मारोती गोविंदराव पांडे (तालुका अध्यक्ष, कॉंग्रेस पार्टी जळकोट) , विजयकुमार भोसले, राजीव सगर, महेश राठोड, शुभम केंद्रे, सत्यवान पाटील सरपंच, हाळदवाढवणा, रमण अदावळे, ओमकार सोनटक्के, शिवशंकर काळे, नाना पवार, यांची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत कार्यालय चिंचोली येथे आयोजित जयंती उत्सवास ग्रामपंचायत अधिकारी एस. एन.आडे, प्रकाश पाटील, पोलीस पाटील बाबुराव बेळकुंदे, संतोष बट्टेवाड, सुरेश पाटील, लक्ष्मण गव्हाणे, विश्वनाथ गव्हाणे, संग्राम बंडरे, संजय गायकवाड, दत्तात्रय गिरी, सुखराज बंडरे दीपक कांबळे, कमलाकर हूंजे, माधव वाघमारे, आकाश बेळकुंदे, संगणक परिचालक स्रेहा गायकवाड, आशा कार्यकर्ती रमाबाई गायकवाड, सुनिता बिरादार तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.
उमरगा रेतु येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  शरद ढोबळे, रोहित खटके, संतोष श्रीमंगले, अक्षय पन्हाळे, सुरज ढोबळे, तुषार पन्हाळे,अजय पन्हाळे,अविनाश ढोबळे ,सौरभ ढोबळे, अनिल ढोबळे ,महेश भवाळ, साईनाथ सूर्यवंशी, बळवंत लिंबुटकर, अंगद पन्हाळे ,गणराज ढोबळे, विलास कापसे, मंगेश जायमेत्रे, फजलमिया देशमुख, बळीराम ढोबळे, एकनाथ ढोबळे,अमोल भुरे, उद्धव वाघमारे, ऋषिकेश ढोबळे, शुभम माळी, सुरज केंद्रे, लक्ष्मण केंद्रे यांनी रक्तदान केले.
यावेळी जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सौरभ ढोबळे ,उपाध्यक्ष सुनील ढोबळे , सरपंच राजकुमार पन्हाळे, चेअरमन अमृत केंद्रे, अनिल ढोबळे, हरिदास ढोबळे, श्याम ढोबळे ,फजल देशमुख, संदीपान माळी, लक्ष्मण केंद्रे, विलास कापसे, राम ढोबळे, बापूराव कापसे, माजी चेअरमन श्रीराम ढोबळे , हुजूर देशमुख, संतोष बैकरे,  महादेव ढोबळे, शुभम माळी , सुरज ढोबळे, नरसिंग माळी, दिगंबर पांचाळ ,अंग श्रीमंगले उपस्थित होते
निलंगा येथे विविध मान्यवरांकडून अभिवादन
निलंगा शहरासह तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. निलंगा शहरात जिजाऊ चौक, हाडगा रोड, दत्तनगर कॉर्नर, आनंद मुनी चौक, दापका वेस येथे व शहरात विविध ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदर संभाजीराव पाटील निलंगेकर, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, मराठा सकल मोर्चा आदीसह विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला.  शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांचा पोवाडा याचा कार्यक्रम झाला. तसेच जिजाऊचा पाळणा कार्यक्रम महिलांनी केला.
 महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ निलंगा आगाराच्या कर्मचा-यांनी शिवजयंतीनिमित्त एसटी बस सजवून त्यावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मिरवणूक काढली. ढोल ताशे, झांज पथक यांचे प्रदर्शन करून शिवभक्तांचे मने जिंकली तर १९ फेब्रुवारी दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १२४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. जिजाऊ चौकात गेल्या दोन दिवसापासून छत्रपती शिवरायांच्या काळातील वापरात येणारे शस्त्र प्रदर्शन भरण्यात आले. यावेळी विद्यार्थी महिलांनी या प्रदर्शनात सहभाग नोंदवून शस्त्रांची माहिती करून घेतली. या ठिकाणी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष संजय हलगरकर ,दत्ता मोहोळकर, नगरसेवक हरी सगरे, सुमित ईनानी, शेषराव ममाळे, विनायक मोहिते, नाना आकडे, वीरू शाहीर, अदीसह शिवभक्त उपस्थित होते. पेठ व दापका वेस येथून शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली तर दुपारी शहरातून युवकांनी दुचाकी रॅली काढली. मुलींनी ढोल ताशा वाजवून आनंदोत्सव  साजरा केला.
उदगीरच्या जीएसपीएमच्या वतीने मशाल रॅली
उदगीर येथे गुणाई शिक्षण प्रसारक मंडळ  द्वारासंचलीत शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, राजीव गांधी तंत्रनिकेतन, एस. आर. इन्स्टीट्यूट ऑफ फार्मसी, राजीव गांधी आय.टी.आय. व जी एस पी एम इंटरनॅशनल स्कूल उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने मशाल रॅली व शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते संस्थेचे सचिव अमित राठोड यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. मशाल रॅली उदगीर किल्ला, चौबारा, पोलीस ठाणे, छत्रपती शिवाजी महाराज चौक, कॅप्टन चौक, औटे पेट्रोल पंप व लहुजी साळवे चौक या प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करीत जी.एस.पी.एम. कॅम्पस येथे पोहोचली. रॅलीदरम्यान ढोल-ताशांच्या गजरात शिवगर्जना, स्फूर्तीदायक घोषणा करण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज  चौक व कॅप्टन चौक येथे विद्यार्थ्यांनी झांज, झेंडा नृत्य, कराटे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण करण्यात आले. जी.एस.पी.एम. कॅम्पस, जळकोट रोड येथे शिवव्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बापूराव राठोड हे उपस्थित होते.
प्रमुख शिवव्याख्याते म्हणून शिवशंकर बालाजी लांडगे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, राष्ट्रप्रेम, शिस्त, नेतृत्वगुण व स्वराज्याची संकल्पना यावर अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे सचिव अमित राठोड उपस्थित होते. तसेच प्राचार्य पी. डी. जाधव, प्राचार्य विजय येळवंतगे व प्राचार्य पी. एम. मरशीवने यांची उपस्थिती लाभली. प्रास्ताविक सचिव  अमित राठोड यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थी लक्ष्मण जायभाये यांनी तर आभार प्रदर्शन सेजल टोम्पे यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR