Homeलातूरजि. प. सदस्या अदावळे यांनी घेतली चेअरमन वैशालीताई देशमुख यांची भेट 

जि. प. सदस्या अदावळे यांनी घेतली चेअरमन वैशालीताई देशमुख यांची भेट 

जळकोट : प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील गुत्ती जिल्हा परिषद गटामधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून निवडून आलेल्या शांताबाई अदावळे यांनी लातूर येथे  विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांची भेट  घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला व सत्कार केला.
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित देशमुख, जिल्हा मध्यवर्ती  बँकेचे अध्यक्ष  धिरज देशमुख यांचीही यावेळी भेट घेतली.  या प्रसंगी नूतन प. स सदस्या मिरा सूर्यवंशी, सदस्य माधव वाघमारे यांची उपस्थिती होती . यावेळी महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शिलाताई पाटील, आशिष पाटील, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज दळवे , रमण अदावळे, विश्वनाथ पाटील, संजय केंद्रे, मेरा संजय सूर्यवंशी, प्रदीप केंद्रे, गोविंद केंद्रे, नूर पटेल, नवीन मुंगळे, गिरीश, प्रफुल आदावळे, राजू मोतेवाड, यांच्यासह मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR