33.9 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरनवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य : प्र. कुलगुरू डॉ.दामा

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य : प्र. कुलगुरू डॉ.दामा

सोलापूर- नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य असून हे धोरण विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले. दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही.जी.शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाच्या १६ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, विश्वस्त प्रा. भिमाशंकर शेटे, डॉ. सिद्धेश्वर वाले, अण्णासाहेब कोतली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय सुत्रावे , उपप्राचार्य एम. बी. पाटील उपस्थित होते.

डॉ. दामा आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यापीठामध्ये भ्रष्टाचार मुक्त कामकाज करून आणखी पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. प्राध्यापकांना सीड मनी, विद्यार्थ्यांना एन. सी. सी वगैरे सुविधा देण्याचा प्रयत्न येत्या नवीन वर्षात विद्यापीठ करीत आहे. शिवदारे महाविद्यालय हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट महाविद्यालय असून या महाविद्यालयाशी जुने नाते असल्याचे त्यांनी सांगितले. त्याबरोबरच नवीन शैक्षणिक धोरण असेही ते म्हणाले.

याप्रसंगी दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संस्थेच्या वतीने डॉ. दामा यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांनी सर्व पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या पारितोषिक वितरण समारंभात ६ प्राध्यापक व १९२ विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रांजल पवार या विद्यार्थिनीस “व्ही.जी.एस.स्टार” हा किताब देण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात कु. विजयालक्ष्मी जेऊरगी या विद्यार्थिनीने गायलेल्या स्वागतगीताने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय सुत्रावे यांनी महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख अतिथींचा परिचय प्रा.डॉ. अनमोल वळसंगे यांनी करून दिला. पुरस्कारांचे यादी वाचन समन्वयक प्रा.एम.बी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शुभदा उपासे-शिवपूजे व प्रा. हरीप्रिया यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. ऋषिकेश धनवे यांनी केले.

याप्रसंगी सुभाष मुनाळे, पशुपती माशाळ, प्रमोद बिराजदार, भिमाशंकर म्हेत्रे, चंद्रकांत गुरव, सिद्धाराम हेळकर, डॉ. बी.एन.कांबळे , डॉ. आर. वाय, पाटील, डॉ. कापसे, प्राचार्या श्रुती गायकवाड, अंजली तिवारी, मुख्याध्यापक पूजा बाजपेयी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR