41 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरपरराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष

परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष

सोलापूर : २०२३-२४ या आर्थिक वर्षात सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मद्यविक्रीतून १५० कोटींपर्यंत महसूल मिळाला आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परराज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवले जात आहे. अवैध वाहतूक, अवैधरीत्या मद्यविक्री, निर्मितीवर देखील आमच्या पथकांचे लक्ष आहे. आता निवडणूक काळात सर्व मद्यविक्री दुकानांना दररोजच्या विक्रीची माहिती द्यावी लागणार आहे.असे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी सांगीतले.

लोकसभा निवडणुकीच्या काळात परराज्यातून अवैधरीत्या दारू येणार नाही, याची खबरदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे. त्यासाठी सहा पथके नेमण्यात आली आहेत. नांदणी, मरवडे, वागदरी याठिकाणी सीमा तपासणी नाके सुरु केले असून त्याठिकाणी सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी केली जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील हातभट्ट्यांवरही छापेमारी सुरु आहे. सोलापूर शहर-जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षात तब्बल एक हजार १२ कोटी रुपयांची मद्यविक्री झाल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाने दिली. त्यात देशी दारू ३३९ कोटींची, विदेशी दारू ६३८ कोटी रुपयांची व बिअर व वाईनची ३५ कोटी रुपयांची विक्री झाली आहे.

दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील ही मद्यविक्री आजवरील विक्रमी आहे .सोलापूर जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षात एकूण सव्वादोन कोटींहून अधिक लिटर मद्यविक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षात देशी दारुची विक्री जवळपास तीन लाख लिटरने कमी झाली आहे. पण, आठ लाख लिटरने विदेशी दारुची विक्री वाढल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे झाली आहे. तसेच बिअरची विक्री २०२२-२३च्या तुलनेत सात लाख लिटरने वाढली आहे.

वाईनची विक्री पाच हजार ७१३ लिटरने वाढल्याचीही नोंद आहे. २०२२-२३मध्ये जिल्ह्यात देशी दारूची विक्री ८७ लाख ४३ हजार लिटर तर विदेशी दारूची विक्री ७८ लाख नऊ हजार लिटर इतकी झाली होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विक्री, निर्मिती अड्ड्यांवर छापे टाकून १२ महिन्यांत जवळपास साडेतीन ते चार कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामीण पोलिसांनीही अवैध हातभट्टीच्या ठिकाणांवर अशीच कारवाई केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR