30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeलातूरनिघाली खास भीम जयंती दिमाखात...

निघाली खास भीम जयंती दिमाखात…

लातूर :  प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीचे औचत्य साधून ”निघाली  खास… भिम जयंती दिमाखात’…. या गिताच्या सादरीकरणाचा शुभारंभ (लॉचिंग) करण्यात आले. या गिताचे सादरीकरण होताच या गिताला भरभरुन प्रतिसाद मिळत असून या गिताचे गितकार राजहंस कांबळे हे दैनिक ‘एकमत’ चे उपसंपादक आहेत.
उपसंपादक राजहंस कांबळे हे गेल्या आठरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. विविध विभागीय दैनिकांत त्यांनी काम केले आहे. विविध प्रश्नावर लिखाण केले आहे. विविध प्रश्नांसंदर्भा उपेक्षीत घटकांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांना शोधवार्ता, विशेष वार्ता, गटातील पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. विविध दैनिकात त्यांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. स्थानिक इलेक्ट्रॅनिक माध्यमातूनही उल्लेखनीय काम केले आहे. ९८ साली त्यांचा ‘विद्रोह’ हा काव्यासंग्रही प्रकाशित झाला आहे. त्यांच्या काव्यसंग्रहास सुप्रसिध्द साहित्यीक ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांची प्रस्तावना आहे. प्रसिध्द साहित्यीक फ. मु. शहाजिंदे, पुरोगामी विचारांचे समाजसेवक तथा माजी सनदी अधिकारी के. ई. हरिदास यांच्या उपस्थितीत काव्यसंग्राचे प्रकाशन झाले आहे.
काव्यसंग्रह प्रसिध्द झाल्यानंतर त्यांना गितकार होण्याची इच्छा होती. दरम्यान त्यांनी मंबई येथील एका हिंदी चित्रपट दिग्दर्शकास पत्राद्वारे संपर्क साधून तीन गिते पाठवून दिली पण त्यानंतर त्याचे पुढे काय झाले माहीत नाही. याची विचारणाही केली गेली नाही. गेल्या २०२३ ला त्यांनी गिताचे लेखन केलेले आहे. त्याचे सादरीकरण तसेच रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर २०२४ हे वर्षे उजाडले. यावर्षी तरी डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त गीताचे रॅकॉर्डिंग करण्यासाठी मित्रपरिवार तसेच त्या क्षेत्रातील कलावंतांशी चर्चा करुन मोठ्या गायकांशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु ते अधिक खर्चिक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहरातील सुप्रसिध्द तरुण गायक अनिल तलवार यांच्याशी एका मित्राकरवी ओळख झाल्यानंतर त्यांनी गित रचना पाहून तसेच त्यांची यासंबधीची ओढ पाहून कोणतीही अपेक्षा न ठेवता सहकार्य केले.
लातुरातील गित रॅकाँर्डिग करणा-या स्टुडिओशी भेट देऊन माहिती घेतली. यानंतर एसबी म्युझीक (लातूर) स्टुडिओमध्ये मुबलक दरात हे गित उत्तमपणे रॅकॉर्डिंग करुन दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी निघाली खास भिम जयंती दिमाखात… या गिताचे सादरीकरण होताच या गिताला भरभरून प्रतिसाद मिळायला सुरूवात झाला असून जयंती दिनी या गितावर अनेकांनी ठेका धरल्याचे ही पहावयास मिळाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR