37.7 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरलातुरात उद्या भीम पहाट कार्यक्रम

लातुरात उद्या भीम पहाट कार्यक्रम

लातूर : प्रतिनिधी
फ्री व्हॉइस ग्रुप, दि पीपल्स महिला अर्बन क्रेडिट को. ऑप सोसायटी लातूरच्या वतीने आयोजित भीम फेस्टिवलचा एक भाग म्हणून उद्या पहाटे सहा वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात प्रसिद्ध गायक राहूलदेव कदम यांच्या आवाजात भीम पहाट हा सुमधुर भीम गीत गायन व अन्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत जयंती साजरी करण्याच्या उद्देशाने लातुरात फ्री व्हॉइस ग्रुपच्या वतीने भीम फेस्टिवल साजरा केला जात असून या उपक्रमास लातूरकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून उद्या बुधवार दि. १७ रोजी पहाटे सहा वाजता दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात प्रसिद्ध गायक राहूलदेव कदम यांचा सुमधुर आवाजात भीम गीत गायनाचा भीम पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
. त्यानंतर आंबेडकरी कवी संमेलन, दुपारी एक वाजता आंबेडकरी दीघाँक अभिवाचन, भव्य रिल्स, नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यकर्माचा समारोप मान्यवारांच्या उपस्थितीत सायंकाळी पाच वाजता विजेत्यांना बक्षीस वितरण करून करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित नाटक, रील, गीत गायन, नृत्य या स्पर्धा पाहण्यासाठी मोफत प्रवेश असणार असून यास लातूरकरांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR