36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरपंढरीतील उद्यानांची दुरवस्था

पंढरीतील उद्यानांची दुरवस्था

पंढरपूर: तुटलेल्या खेळण्यांचे शिल्लक राहिलेले सांगाडे… मिनी ट्रेन गायब अन् उरले फक्त रेल्वेचे रूळ… उन्हात करपलेले गवत… सुकलेले असंख्य शोभिवंत वृक्ष… बंद घडलेले कारंजे… भंगार झालेली लोखंडी आसने… अशी दुरवस्था झाली आहे पंढरीतील जिजामाता व पद्मावती उद्यानाची! कोणे एकेकाळी पंढरीच्या वैभवात भर घालणारी ही दोन्ही उद्याने सध्या भकास झाल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड होत आहे. पंढरपूर नगरपालिकेने तातडीने या उद्यानांची दुरुस्ती करावी, अशी मागणी समस्त पंढरपूरकरांकडून होत आहे.

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लोकसंख्या सुमारे दोन ते अडीच लाखांच्या आसपास गेली आहे.एवढ्या मोठ्या लोकसंख्येचा समावेशअसलेल्या पंढरपूर नगरपालिका हद्दीतीलनागरिकांना विरंगुळ्यासाठी, तर बच्चे कंपनीला खेळण्यासाठी पालिकेचे एकही उद्यान सध्या सुस्थितीत नाही. शहरातील शिवानी चौक परिसरात असलेल्या एकेकाळी नागरिकांच्या आवडीचे रमणीय जिजामाता व पद्मावती ही उद्याने पर्यटनस्थळे होती.

या उद्यानांमध्ये पूर्वी विविधरंगी गुलाबाची बाग होती, गर्द वृक्षांची दाटी होती, पाळणा, सीसों, भुलभुलय्या , घसरगुंडी, झोपाळे अशी खेळणी होती.रंगीबेरंगी पाण्याचे तुषार उडवणारीकारंजी होती, त्यामुळे हो दोन्ही उद्याने पंढरपूरचे वैभव होती. जिजामाता उद्यानाच्या लॉनमध्ये तर राज्यातील सुप्रसिद्ध लेखक, साहित्यिक व विचारवंतांची व्याख्यानेहोत असत. या व्याख्यानांना सुजनशीलपंढरपूरकर रसिकांची मोठी गर्दी होत असे. मात्र, सध्या या लॉनमधील गवतपूर्णपणे जळून गेले आहे. तर छोटेखानीकाँक्रिटच्या व्यासपीठाला भेगा पडल्या आहेत. तर दोन्ही बागांमध्ये असलेल्या मिनी ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी बच्चे कंपनीची अक्षरशः झुंबड उडालेली असे.मात्र, कालांतराने पालिकेच्या देखभाल व दुरुस्तीअभावी या उद्यानांची मागील काही वर्षापासून दुरवस्था झाली आहे.

दोन्ही उद्यानांमधील खेळण्यांचे साहित्य ऊन पावसात गंजून भंगार झाले आहे. मिनीट्रेन तर दृष्टीस पडत नसून त्या ट्रेनचे फक्तरूळ शिल्लक राहिले आहेत. शोभिवंतझाडे जळाल्याने उद्यान रखरखीत झाले आहे. एकंदरीतच, ही दोन्ही उद्याने भकासझाल्याने बच्चे कंपनीचा हिरमोड झाला असून, ती उदास झाली आहेत.पुढील महिन्यात वार्षिक परीक्षा संपून उन्हाळी सुट्या सुरू होतील. त्यामुळे पालिकेने तातडीने या दोन्ही बागांचीदुरुस्ती करून बाळगोपाळांना उन्हाळीसुटीत खेळण्यासाठी उद्याने उपलब्धकरून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडूनहोत आहे. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने जिजामाता वपद्मावती उद्यान नव्याने विकसित करण्यात येतआहे. या दोन्ही उद्यानांतीत विकासकामांची निविदा प्रक्रियापूर्ण होऊन ठेकेदाराला वर्कऑर्डर दिली असून, कामालासुरवात देखील झाली आहे. दोन्ही उद्यानांतील विकासकामेदर्जेदार व्हावीत, याची दक्षता घेण्यात येत असून, उद्यानलवकरात लवकर नागरिकांसाठी खुले व्हावे यासाठी प्रपत्नशील आहे.असे पंढरपूर नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR