34.5 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरबसमध्ये चढताना दागिने, रोकड लंपास

बसमध्ये चढताना दागिने, रोकड लंपास

सोलापूर: छत्रपती शिवाजी महाराज चौकातील मुख्य बस स्थानकावरील प्लॉट क्र. एकवरील सोलापूर ते उमरगा या बसमध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधून दागिने व रोकड, असा एकूण दोन लाख २९ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला आहे. या प्रकरणी कमल गणेश गजरे (रा. मुंबई) यांनी फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिस चोरट्याचा शोध घेत आहेत.

मुंबईतील मिरा रोडवरील पार्क बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या कमल गजरे (वय ५०) या सोलापूर- उमरगा बसमधून गावी जात होत्या. सकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास त्या बसमध्येचढत असताना गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या पर्समधून दागिने व रोकड लंपास केली. त्यात साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, दोन तोळ्याचा लक्ष्मीहार, एक तोळ्याची कर्णफुले, सात ग्रॅमची बोरमाळ, दोन तोळ्याचा चांदीचा छल्ला व आठ हजार रुपये रोख, असा एक लाख २९ हजार रुपयांचा ऐवज होता. पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे तपास करीत आहेत.

सोलापूरच्या मुख्य बसस्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची गर्दी असते. तरीदेखील बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेरे दोन दिवसांपासून बंद होते. दोन-तीन दिवसांपूर्वी एका प्रवाशाचा एसटीत चढताना मोबाईल चोरीला गेला होता, त्यामुळे फौजदार चावडी पोलिसांनी कॅमेरे चालू करून घेण्यासाठी तेथील कर्मचाऱ्याला बजावले होते. आता तेथील कॅमेरे सुरु केले आहेत, पण २६ ते २८ मार्च या काळात कॅमेरे बंद असल्याने स्थानकावरील रेकॉर्डिंगच झालेले नाही. त्यामुळे खबऱ्याच्य माध्यमातून चोरट्याचा तपास सुरु असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR