35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरराज्य उत्पादन शुल्क, एसएसटी, एफएसटी पथकाची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क, एसएसटी, एफएसटी पथकाची कारवाई

लातूर : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे लातूर जिल्हयाचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने दि. २१ एप्रिल रोजी अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस विभाग, उदगीर ग्रामीण व वाढवणा यांनी संयुक्तरित्या हाकनाकवाडी शिवार, डोंगरशेळकी तांडा व उदगीर ग्रामीण भागात विशेष मोहिम राबवून ६ गुन्हे नोंद करण्यात आले. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली. सदर गुन्हयामध्ये हातभट्टी दारु १५० लि., हातभट्टी बनविण्याचे रसायन २००० लि., देशी ९ लि. असा १ लाख ८ हजार ८१० रुपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

सदरच्या कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क उदगीर विभागाचे निरीक्षक आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक रोटे, ए. एस. घुगे, एन. डी. कचरे, बी. एस. पी. मळगे, एम. जी. पाटील, आर. जी. सलगर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, एन. टी. गुणाले, जवान जे. आर. पवार, ए. ए. देशपांडे, उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन निरीक्षक अरंिवद पवार, दुय्यम निरीक्षक आर. के. मुंडे, हेड कॉन्स्टेबल एस. सी. बनसोडे, संतोष शिंदे, नामदेव चेवले, एन. एन. कुलकर्णी आणि वाढवणा पोलिस स्टेशनचे मुरारी गायकवाड अविनाश मारमवार, अभिषेक बिरादार यांनी सहभाग नोंदविला. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, लातूर यांनी अवैध मद्य विक्री, वाहतूक विरोधात कर्नाटक राज्याच्या सीमेवर सीमा तपासणी नाका उभारला असुन अवैध मद्य विक्री, वाहतूक विरोधात विविध पथके नियुक्त केले असुन, सदर पथके दिवसा तसेच रात्री देखील कार्यरत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR