Homeलातूरलातूर जिल्हा परिषदेच्या भाजपाच्या एकहाती सत्तेला सुरूंग

लातूर जिल्हा परिषदेच्या भाजपाच्या एकहाती सत्तेला सुरूंग

लातूर : योगीराज पिसाळ
मिनी मंत्रालय म्हणून समजल्या जाणा-या लातूर जिल्हा परिषदेच्या ५९ जागेसाठी सोमवारी मतमोजणी झाली. या मतमोजणीत भाजपाचे संख्याबळ निम्याने घटले. तर राष्ट्रवादी काँग्रसचे संख्याबळ हे निम्यापेक्षा जास्त संख्येने वाढले आहे. तर काँग्रेसच्याही संख्या बळात मोठी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाने लातूर जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आणली होती. मात्र यावर्षी या सत्तेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, उध्दव ठाकरे शिवसेना गट, शिवसेना, शरद पवार राष्ट्रवादी गट व अपक्षांनी सुरूंग लावल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
२०१७ साली जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला ५८ पैकी ३६ जागेवर यश मिळाले होते. तर कॉग्रेसला १५ जागेवर, राष्ट्रवादी कॉंग्रेसला ५ जागेवर, शिवसेनेला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेसने पाच वर्षे किल्ला लढवत असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने चांगली साथ दिली होती. मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषद सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने गेल्या तीन ते चार वर्षापासून लातूर जिल्हा परिषदेवर प्रशासक राज सुरू आहे.
गेल्यावर्षी लातूर जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेत गेल्यावर्षी सदस्य संख्या ५८ वरून ५९ झाली आहे. या ५९ जागेसाठी शनिवारी जिल्हयात मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली आहे. या मतमोजणीत भाजपाला केवळ १८ जागेवर समाधान मानावे लागणार आहे. २०१७ च्या तुलनेत निम्याने संख्याबळ घसरले आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्या बळ ५ वरून निम्यापेक्षा जास्त १२ पर्यंत वाढले आहे. तर काँग्रेस पक्षाचेही संख्याबळ १५ वरून २३ वर पोहचले आहे. तसेच शदर पवार राष्ट्रवादी गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, उध्दव ठाकरे शिवसेना गट  यांच्या प्रत्येकी १ जागा व अपक्षांच्या दोन जागा निवडूण आल्याने जिल्हा परिषदेच्या सत्तेचे गणित बिघडले आहे. जिल्हा परिषदेच्या जागेसाठीचा निकाल भाजपा सोडला तर सर्वच पक्षांना उभारी देणारा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR