38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeधाराशिववडीलांवरील टिका खपवून घेतली जाणार नाही

वडीलांवरील टिका खपवून घेतली जाणार नाही

खा. ओमराजेंनी दिला पालकमंत्री सावंताना इशारा

धाराशिव : प्रतिनिधी
तुमच्या वयाचा मान ठेवतो म्हणून तुमच्यावर आम्ही बोलत नाही. पण त्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढत असाल, तर यापुढे वडीलावर टिका केल्यास ती अजिबात खपवून घेणार नाही, असा इशाराच खा. ओमराजे निंबाळकर यांनी पालकमंत्री प्रा. तानाजी सावंताना दिला आहे.
धाराशिव तालुक्यातील उपळा (मा.) येथे आयोजित लोकसभा निवडणूक प्रचार सभेत खासदार ओमराजे बोलत होते.

प्रा. तानाजी सावंत यांनी ढोकी ता. धाराशिव येथे दि. २५ रोजी शिवसेनेचा मेळावा आयोजीत केला होता. त्यावेळी प्रा. सावंत यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली होती. मात्र प्रा. सावंत यानी स्व. पवनराजे साहेब यांच्यावरही विनाकारक टिका केल्याने ओमराजे यांनी त्यांना थेट उत्तर दिले आहे.

यावेळी बोलताना ओमराजे म्हणाले की, आम्ही तुमच्यासोबत गद्दारी केली नाही, म्हणून तुमचा राग आमच्यावर आहे. या अगोदरही ही खदखद तुम्ही अनेकवेळा बोलुन दाखविली आहे. आता तुम्ही बोलण्याची मर्यादा ओलांडली आहे. तुमची पात्रता नसताना पवनराजे साहेंबावर बोलण्याचे धाडस केले आहे. हे मी कदापी सहन करणार नसल्याचे खासदार ओमराजे यांनी सावंताना प्रतित्त्तुर दिले. एवढे शिक्षण, गोल्ड मेडलिस्ट, पीएचडी धारक असल्यानंतरही तुमच्या बोलण्याची पध्दत अत्यंत खालच्या पातळीवर असल्याचे आश्चर्य आहे. यावरुन तुमच्यावर संस्कार करण्यात तुमचे मातापिता कमी पडले का, अशी शंका येते. तुमचे वय पाहुन आतापर्यंत तुम्हाला काही बोललो नाही. याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असे गृहित धरु नये. असाही इशारा ओमराजे यांनी यावेळी प्रा. सावंत याना दिला. यापुढे राजेसाहेबांबद्दल ब्र शब्द देखील आपण काढला तर मी सहन करणार नाही, अशा सुचक इशाराच दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR