38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरशासनाने तातडीने दुध अनुदान जमा करावे : भैय्या देशमुख

शासनाने तातडीने दुध अनुदान जमा करावे : भैय्या देशमुख

सोलापूर / प्रतिनिधी

दुध उत्पादक शेतक-यांचे २६ रुपये प्रतिलिटर दुध घेतले जाते. मात्र सध्या जनावरांचा चारा आणि पशुखाद्याच्याकिंमती वाढल्या आहेत. त्यामुळे २६ रुपयांचा भाव परवडत नाही. त्यामुळे शासनाने यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी वारंवार केली जात होती. त्यावर शासनाने प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप शेतक-यांना हे अनुदान मिळालेले नाही. त्यामुळे शासनाने याची गांभीर्याने दखल घेवून तातडीने अनुदान जमा करावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.

पशुखाद्याच्या महागाईने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यांना काही अंशी आर्थिक दिलासा मिळावा, यासाठी शासनाने दुध उत्पादक शेतक-यांना प्रति लिटर ५ रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. मात्र त्याला ही दोन तीन महिने लोटले तरी शेतक-यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही त्यामुळे शेतक-यांना तातडीने दुधाचे अनुदान द्यावे, अन्यथा येत्या काही दिवसात शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभा करण्यात येणार असून एक लिटरही दुध बाहेरच्या जिल्ह्यात आणि राज्यात जावू दिले जाणार नाही. याची दखल शासनाने घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR