36.1 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरवैराग परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ,पर्यावरणाची हानी

वैराग परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ,पर्यावरणाची हानी

वैराग : यंदा मार्च महिन्यामध्ये लवकरच उन्हाचा पारा चढलेला असल्याने अनेक ठिकाणी नैसर्गिक आगीच्या घटना घडत आहेत. मात्र धुरामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढून पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे. वैराग (ता. बार्शी) परिसरात गेल्या महिनाभरात अनेक ठिकाणी नैसर्गिक व कृत्रिम आगीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणाची हानी होऊन मोठे नुकसान होत आहे. अशा आगीच्या घटनेमध्ये निघणाऱ्या धुरामधून प्रचंड प्रदूषण होते.

वैराग येथे असणाऱ्या संतनाथ सहकारी कारखान्यांमध्ये फेब्रुवारी महिन्यात दोन वेळा आगीच्या घटना घडल्या. अज्ञाताने आग लावल्यामुळे
सुमारे ५० एकर क्षेत्रावरील गवत व झुडपे जळून खाक झाली. वैराग- उस्मानाबाद रस्त्यालगत वैराग नगरपंचायतीचा कचरा डेपो आहे. तेथेही नैसर्गिक आग लागून सुमारे वीस पंचवीस एकर क्षेत्र जळून खाक झाले. दुर्दैवाने जवळच असणाऱ्या जंगलाला आग लागली नसल्याने मोठी हानी टळली. मानेगाव येथील किरण कदम या शेतकऱ्यांच्या शेतात अज्ञाताने आग लावल्याने उसाचे पाचट जळाले. पाइपचे हजारो रुपयांचे साहित्य जळून नुकसान झाले.
सध्या शेतातील ज्वारी, गहू व इतर पिके काढल्याने रानं मोकळी झाली आहेत. शेतातील ऊस कारखान्याला गेल्याने उसाचे पाचट पेटवण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. त्यामुळे दररोज अशा पाचट पेटवण्याच्या घटना पाहायला मिळतात. शेताच्या बांधांना पेटवूनरान स्वच्छ करण्याच्या देखील शेतकऱ्याचा कल आहे. त्यामुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होऊन वातावरणात प्रदूषण वाढत आहे.विषेशतः अशा प्रकारच्या घटनांमुळे वातावरणातील तापमान देखील वाढते आहे.

निसर्गातील सर्व घटना नियमानुसारच घडतात त्यामुळेच पर्यावरणाचे संतुलन राहाते मानवी कृत्यामुळेच निसर्ग नियमात अडथळा निर्माण होतो व पर्यावरणाचे संतुलन बिघडते. वणवा अथवा झाडांना लावलेल्या आगी प्रदुषण तर करतातच. त्याचबरोबर त्या क्षेत्रातीत सूक्ष्म जीव, पशु, पक्षी याचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येते. असे सुवर्णलता गांधी महाविद्यालय, वैरागचे भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजयकुमार पुकाळे यांनी सांगीतले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR