36 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरसमांतरसाठी ७६ कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव

समांतरसाठी ७६ कोटींच्या कर्जाचा प्रस्ताव

सोलापूर : समांतर जलवाहिनीसाठी उपलब्ध निधीतून कामे सुरू आहेत. आतापर्यंत साधारण ६० टक्के काम पूर्ण झाले आहे. जिथे अडचणी निर्माण झाल्या तिथे मार्ग काढून काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. रेल्वेचे क्रॉसिंग महत्त्वाचे होते. तीन क्रॉसिंगपैकी दोन ठिकाणची मान्यता मिळाली.

प्रकल्पाच्या वाढीव ३८२ कोटींपैकी महापालिकेला भरावे लागणाऱ्या ११४ कोटी पैकी ७६ कोटीचे कर्ज काढावे लागणार आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव दीला आहे.असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगीतले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत समांतर जलवाहिनीच्या वाढीव ३८२ कोटी ६८ लाख रुपयांच्या वाढीव निधीस मान्यता मिळाली. या निधीपैकी महापालिकेला भरावयाच्या हिस्स्यापोटी एकूण रकमेपैकी ७६ कोटी कर्जाचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे दिला आहे. आता कर्जाच्या प्रतिक्षेत महापालिका आहे.

महानगरपालिकेची समांतर जलवाहिनीने अनेक अडथळे पार करीत गेल्या दहा महिन्यांपासून गती घेतली आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत महापालिका आयुक्तांनी समांतर जलवाहिनीच्याप्रकल्पाबाबत सविस्तर मुद्दे मांडले. या प्रकल्पामध्ये ११० एमएलडीवरून १७० एमएलडी क्षमतेची जलवाहिनी
आणि पाकणी जलशुद्धीकरण केंद्रासह इतर कामांचाही समावेश करण्यात आला होता.

यामुळे वाढीव प्रकल्पाची किंमत ही ८८२ कोटी ६८ लाखांवर गेला. त्यापैकी २५० कोटी स्मार्ट सिटी आणि एटीपीसी २५० कोटी असे एकूण ५०० कोटी उपलब्ध झाले. वाढीव ३८२ कोटी ६८ लाखांच्या निधीस शासनाने मान्यता दिली.मात्र यामध्ये शासनाचा हिस्सा २६८ कोटी रुपयांचा तर महापालिका देयक रक्कम ११४ कोटी इतकी आहे. महापालिका आयुक्तांनी ३८ कोटींची तरतूद केली आहे. उर्वरित ७६ कोटींचे कर्ज महापालिकेला काढावे लागणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR