34.4 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरसमाजातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे

समाजातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे

लातूर : प्रतिनिधी
देशातील सामान्य माणसाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी, समाजातील भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी, शेतमालाला हमीभाव  देण्यासाठी, महागाई भरमसाठ वाढली ती कमी करण्यासाठी, उच्चशिक्षण घेऊन देखील बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार देण्यासाठी, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, ती सुधारण्यासाठी, मनरेगा अंतर्गत हाताला काम मिळावे यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले
लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा मतदारांशी परिचय व्हावा यासाठी गेल्या कांही दिवसापासून लातुर लोकसभा मतदारसंघात सुसंवाद बैठका घेतल्या जात आहेत. लातुर विधानसभा मतदार संघातील वासनगाव येथे सोमवार दि. १५ एप्रिल रोजी सायंकाळी रमेश थोरमोटे पाटील यांच्या निवासस्थानी आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संवाद बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला वासनगावसह परिसरातील जेष्ठ नागरिक, युवक उपस्थित होते.
लातुर लोकसभा निवडणुक २०२४ निमित्ताने आपण वासनगाव याठिकाणी डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी एकत्र आलेलो आहोत, असे सांगून आमदार अमित देशमुख म्हणाले की, वासनगाव हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असून आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख यांच्या हृदयाजवळील हे गाव असून या ठिकाणी आल्यानंतर आपल्या घरी असल्याचे वाटते असे सांगीतले. लातुर लोकसभेचे तत्कालीन खासदार मतदार संघात सोडा, सभागृहात तरी कधी आले की नाही? कधी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले की नाही? अशी शंकाच आहे. सद्या आपल्याला सामान्य माणसाला दु:खातून बाहेर काढण्यासाठी, भीतीचे वातावरण दूर करण्यासाठी, शेतमालाला भाव  देण्यासाठी, महागाई भरमसाठ वाढली ती कमी करण्यासाठी, उच्चशिक्षण घेऊन देखील बेरोजगार असलेल्या युवकांना रोजगार देण्यासाठी, महिला भगिनी सुरक्षित राहाव्यात यासाठी, कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, ती सुधारण्यासाठी, मनरेगा अंतर्गत हाताला काम मिळावे यासाठी आपण डॉ. शिवाजी काळगे यांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आज देशात आणि राज्यात काय सुरू आहे हे आपण पाहत आहोत. प्रत्येक भारतीयांच्या मनात भीती आहे आणि सरकार केवळ भूल थापा देण्यापलीकडे काहीच करीत नाही. सोयाबीनला १० वर्षांपूर्वी सरकारने दाम दुप्पट करण्यात येणार असे आश्वासन दिले आज सोयाबीनचे भाव वाढणे  तर दुर उलट कमी झाले असे  सांगीतले.
पुढे बोलताना आमदार अमित देशमुख म्हणाले की, मागील काळात आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख साहेबांनी जे विचार दिले यावर आपले लातुर घडले. यापुढे देखील लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला काँग्रेस पक्षाच्या पाठिशी उभे राहावे लागेल. आम्ही तर आहोत आमच्या सोबत म्हणजे आमदार आणि खासदार असे डबल इंजिन लातूरच्या विकासासाठी असल्यास लातुरचा विकास आणखीन झपाट्याने होईल यासाठी आपण बाकीच्या चर्चा अधिक करण्या ऐवजी आपली व आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांची चर्चा करावी, विरोधी पक्षा पेक्षा आपला उमेदवार किती चांगला आहे याची माहिती  प्रत्येक मतदाराला द्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी निरीक्षक सर्जेराव मोरे, तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, तात्यासाहेब देशमुख, श्रीकृष्ण पाटील, रमेश थोरमोटे पाटील, सतीश कानडे, लक्ष्मण मारडकर, हरिभाऊ घोगरे, भूजंग जाधव, भागवत साळुंके, नामदेव मारडकर, विठ्ठल डुरे, रघुनाथ मस्के, विठ्ठल पाटील, रावसाहेब जाधव, सुखदेव पाटील यांच्यासह वासनगाव परिसरातील जेष्ठ नागरिक, ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी या बैठकीला उपस्थित  सर्वांचे आभार गोविंद डुरे पाटील यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR