31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeराष्ट्रीयअदानी देणार मोफत 5-जी!

अदानी देणार मोफत 5-जी!

मुंबई : सध्या भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओची सत्ता आहे. पण आता जिओला लवकरच टक्कर देण्यासाठी उद्योगपती गौतम अदानी लवकरच टेलिकॉम उद्योगात उतरण्याची शक्यता आहे. भारतात स्पेक्ट्रम लिलाव २० मे पासून सुरू होणार आहे. दूरसंचार विभागाने यासंदर्भात ८ मार्च रोजी नोटीसही जारी केली आहे.

गेल्या स्पेक्ट्रम लिलावात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे यंदाही कोट्यधीश उद्योगपती लिलावात सहभागी होणार असल्याचे मानले जात आहे. अदानी 5-जी इंटरनेट मिळविण्याची संभाव्य संधी शोधत आहे.

काही काळापूर्वी गौतम अदानी यांनी कर्मचा-यांसोबतच्या बैठकीत सांगितले होते की, ते त्यांच्या डेटा सेंटरचा विस्तार करण्याचा विचार करत आहेत. याशिवाय ते एआय-एमएल आणि इंडस्ट्रियल क्लाउडवरही काम करत आहेत.

गौतम अदानी देशातील 5-जी ​​इंटरनेटच्या वाढत्या स्पर्धेत सहभागी होण्याचा विचार करत आहेत. दरम्यान, क्वॉलकॉमचे सीईओ काही दिवसांपूर्वी भारतात आले आणि त्यांनी गौतम अदानी यांची भेट घेतली. गौतम अदानी यांनी या बैठकीची माहिती ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली होती, त्यानंतर ही चर्चा आणखी वाढली आहे.

रिपोर्ट्सनुसार, अदानी लवकरच नवीन कंपनीची घोषणा करु शकतात, परंतु कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गौतम अदानी यांनीही ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR