30.7 C
Latur
Friday, May 10, 2024
Homeधाराशिवउमरगा येथे शाब्दीक बाचाबाचीतून एकाचा खून

उमरगा येथे शाब्दीक बाचाबाचीतून एकाचा खून

धाराशिव : प्रतिनिधी
उमरगा शहरातील विश्व बिअरबार समोर शाब्दीक बाचाबाचीतून एका ५८ वर्षीय व्यक्तीचा खून झाला आहे. ही घटना दि. १७ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. पुरूषोत्तम उर्फ सुनिल मनोहर राखेलकर रा, बालाजी नगर उमरगा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाणे येथे दि. १८ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमरगा येथील विश्व बिअरबार समोर आरोपी रोहीत सुभाष राठोड रा. शास्त्रीनगर उमरगा व मयत पुरूषोत्तम उर्फ सुनिल मनोहर राखेलकर यांच्यात दि. १७ मार्च रोजी रात्री ११ वाजता शाब्दीक बाचाबाची झाली. यावेळी आरोपी रोहित राठोड याने पुरूषोत्तम राखेलकर यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. डोके जमीनीवर व बादलीवर आपटून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने प्रेत ओढत नेऊन बंजारा धाब्याजवळ झाडाखाली टाकून दिले. या प्रकरणी मयताचा भाऊ पांडुरंग मनोहर राखेलकर रा. राम मंदीर समोर बालाजी नगर उमरगा यांनी दि.१८ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पोलीस ठाणे येथे ३०२, २०१ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR