35.8 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरशरद पवार गटाच्या नेत्याची वेशीवरच नाकाबंदी

शरद पवार गटाच्या नेत्याची वेशीवरच नाकाबंदी

बीड : मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश न करता, सगेसोय-यांच्या मुद्याची अंमलबजावणी न करता दिलेल्या स्वतंत्र्य आरक्षणावरून मराठा आंदोलकांमध्ये धुसफूस असल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात याची तीव्रता जास्त असून त्याचा फटका आता राजकीय नेत्यांना बसत असल्याचे चित्र आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी गेलेल्या शरद पवार गटाचे नेते, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांना बीडमधील तालखेड गावातील मराठा तरुणांनी गावात प्रवेश करू दिला नाही. जोपर्यंत सगेसोय-याच्या मुद्द्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत गावात येऊ नका असा इशाराही त्यांनी दिला.

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड येथे लोकसभेच्या अनुषंगाने फिरत असलेले माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयसिंगराव गायकवाड हे गुरूवारी दुपारी आले होते. ते येताच गावातील काही युवकांनी त्यांना खाली उतरण्यास मज्जाव केला. यानंतर गायकवाड यांना गाडीतून खाली न उतरताच परतण्याची वेळ आली.

दारात येऊ नका म्हटले तरी कशाला येता
बीड जिल्ह्याचे दोन वेळा खासदार राहिलेले आणि एक वेळा केंद्रात मंत्री राहिलेले जयंिसगराव गायकवाड हे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्याचा दौरा करत आहेत. त्यांना मराठा समाजातील तरुणांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ते माजलगाव तालुक्यातील तालखेड या ठिकाणी भेटीगाठीच्या निमित्ताने आले होते. त्यांनी गावात प्रवेश करताच आमच्या गावात, दारात येऊ नका म्हटले तरी कशाला येता रे नेते अशा शब्दात तरुणांनी खडसावले. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही आणि सगेसोय-यांना आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत आम्ही गावात फिरकू देणार नाही असे म्हणत त्यांना खाली उतरूच दिले नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR