39 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात कंटेनरची ४ ते ५ वाहनांना धडक, दोघे ठार

पुण्यात कंटेनरची ४ ते ५ वाहनांना धडक, दोघे ठार

पुणे : पुणे शहरातील जांभूळवाडी येथील दरी पुलावर शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने ४ ते ५ वाहनांना धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला असून तीन ते चार जण जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुणे-बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूलावर हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास साता-याच्या बाजूने येणा-या एका भरधाव कंटेनरने मुंबईच्या दिशेने येणा-या ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR