40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरदौंड-अंकाई सेक्शन पुण्यात समाविष्ट होणार

दौंड-अंकाई सेक्शन पुण्यात समाविष्ट होणार

सोलापूर :
रेल्वे बोर्डनि दौंड-अंकाईपर्यंतचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या सोलापूर विभागात असलेला सुमारे ३०४.५९ किलोमीटरचा मार्ग आणि त्यावरील २४ स्थानके पुणे विभागात समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे सोलापूर विभागाचे क्षेत्र घटणार आहे.
याने गाड्यांचे परिचालन बोर्ड, गुड्स, तिकीट चेकिंग आदी बाबींवर सोलापूर विभागीय कार्यालयात झालेल्या सोलापूर व पुणे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्राथमिक बैठकीत चर्चा झाली. त्यामुळे आता दौंड ते अंकाई हा सेक्शन पुणे विभागात वर्ग करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, यापूर्वी पुणे विभागाचे कार्यक्षेत्र सोलापूरपेक्षा कमी होते.

संतुलन राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. असे असले तरी सोलापूर विभागाचे उत्पन्न कमी होणार आहे. हा प्रस्ताव २०२१ मध्ये रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. त्यास रेल्वे बोडनि मंजुरी दिली आहे. या बैठकीत सोलापूर विभागातील इंजिनिअरिंग, परिचालन, सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन, वाणिज्य, पर्सनल, आरपीएफ आदी विषयांवर सविस्तर चर्चा दोन्ही विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली. यात येत्या काळामध्ये ऑपरेटिंग परिचलन वसिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन यांच्यामध्ये एक एप्रिलपर्यंत दररोज दोन्ही विभागांच्या परिचलन विभागाकडून गाड्यांचे ऑपरेटिंग सुरळीत राखण्यासाठी चर्चा होणार आहे.

यात सर्वात महत्त्वाचा परिचलन व सिग्नल अँड टेलिकम्युनिकेशन हा विभाग असल्याने कंट्रोल बोर्ड पुणे विभागाकडे हस्तांतरण करण्याचे चॅलेंजिंग काम असणार आहे. सोमवार, एक एप्रिलपासून या सेक्शनचे काम पुणे विभागाकडून पाहण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीस पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, डॉ. मिलिंद हिरवे, डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय यांत्रिक अभियंता विभागीय कार्मिक अधिकारी यांच्यासह सोलापूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे, शैलेंद्रसिंह परिहार, योगेश पाटील, दीपक आजाद, जे. एन. गुप्ता, राहुल गौड, अनुभव वार्षणेय तसेच अन्य विभागांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.दौंड, अहमदनगर, येवला, शिर्डीसारखी महत्त्वाची व उत्पन्न मिळवून देणारी स्थानके पुणे विभागात गेल्याने पुणे विभागाचे उत्पन्न वाढणार आहे. सोलापूर विभागाचे उत्पन्न कमी होणार आहे. सर्वाधिक उत्पन्न हे या सेक्शनमध्ये मालवाहतुकीतून आणि तिकीट तपासणीतून मिळत होते. मात्र,आता हे उत्पन्नदेखील घटणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR