38.7 C
Latur
Saturday, May 4, 2024
Homeसोलापूररूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू

रूपाभवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी अखेर पूर्ववत सुरू

सोलापूर-
बालाजी अमाईन्सच्यावतीने एक कोटी २७ लाख रुपये सीएसआर निधीतून रूपाभवानी स्मशानभूमीत बसविलेल्या विद्युत दाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. अखेर ही विद्युत दाहिनी पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
सोलापूर महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद असल्याचा आरोप करत महापालिकेने तत्काळ विद्युत दाहिनीची तांत्रिक दुरुस्ती करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी तसेच दुरुस्ती कामासाठी महापालिकेने यापुढे मक्तेदार नेमावा, अशी मागणी उद्योजक केतन वोरा यांनी मागील महिन्यात केली होती. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून महापालिकेने विद्युत दाहिनी दुरुस्तीसाठी एका मक्तेदारावर जबाबदारी सोपवली आहे.

बालाजी अमाईन्स कंपनीने येथील विद्युत दाहिनी व सर्व परिसराचे २६ जानेवारी २०२२ रोजी लोकार्पण करून महापालिकेकडे हस्तांतरित केले. कंपनीच्या वतीने विद्युत दाहिनी देखभाल दुरुस्तीचा मक्ता दोन वर्षासाठी मनीष इटरप्राईजेस या मक्तेदाराला देण्यात आला. तसा दोन वर्षाचा करारही झाला. दरम्यानच्या काळात या देखभाल दुरुस्ती मक्ता कराराची दोन वर्षाची मुदत दि. ५ जानेवारी २०२४ रोजी संपली. मागील महिन्यात येथील विद्युत दाहिनी तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली होती.रूपा भवानी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी बंद पडली होती.

यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने विद्युत दाहिनी मक्तेदार नेमून दुरुस्त करून घ्यावी अशी मागणी केली होती. या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. अखेर महापालिका प्रशासनाने दुरुस्तीचे काम पूर्ण केले आणि ही विद्युत दाहिनी सुरू झाली आहे. मक्तेदारही नेमला आहे. कार्यवाही झाल्याने समाधान वाटले. नागरिकांची गैरसोय टळली, असे सांगत उद्योजक केतन वोरा यांनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR