21.4 C
Latur
Saturday, December 7, 2024
Homeराष्ट्रीयडीएमच्या गाडीची चौघांना धडक; तिघांचा मृत्यू

डीएमच्या गाडीची चौघांना धडक; तिघांचा मृत्यू

पाटणा : मधेपुरा जिल्ह्याचे जिल्हा दंडाधिकारी (डीएम) विजय प्रकाश मीना यांच्या वाहनाने मंगळवारी चौघांना धडक दिल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे. मधुबनी जिल्ह्यातील फुलपारस पोलीस स्टेशन हद्दीतील फुलपारस-पुरवारी टोलाजवळ ही घटना घडली. पोलिसांनी अपघाताची पुष्टी केली असून त्यांनी सांगितले की, मधेपुरा जिल्हा दंडाधिकारी यांची कार चार जणांना धडकल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या रेलिंगला धडकली.

मधुबनीचे पोलीस अधीक्षक (एसपी) सुशील कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, मधेपुराचे डीएम कारच्या आत होते की नाही हे माहित नाही. कारमधील लोकांनी गाडी सोडून घटनास्थळावरून पळ काढला. गाडी दरभंगाच्या दिशेने जात होती. त्यांनी सांगितले की, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, कार भरधाव वेगाने येत होती आणि जेव्हा ड्रायव्हरने रस्ता ओलांडणाऱ्या लोकांच्या गटाला धडकणे टाळण्याचा प्रयत्न केला तेव्हा कारने जोरात वळण घेतले.

अपघाताच्या निषेधार्थ स्थानिक लोकांनी रास्ता रोको केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, आता महामार्गावर वाहतूक सुरू झाली आहे. या घटनेसंदर्भात एफआयआर नोंदवण्यात येत असून अपघाताला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या मधेपुरा जिल्हा प्रशासन अपघातावर काहीही बोलण्याचे टाळत आहे. डीएम कुठून येत होते आणि अपघात कसा झाला याबाबत सध्या शंका उपस्थित होत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR