27.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeलातूरनिष्क्रीय, असंवेदनशील सत्ताधा-यांना बदलण्यासाठी सज्ज व्हा !

निष्क्रीय, असंवेदनशील सत्ताधा-यांना बदलण्यासाठी सज्ज व्हा !

लातूर : प्रतिनिधी
सन २०१४ ला दिशाभुल करणारी सत्ताधा-यांनी सन २०१९ मध्ये नवीन आश्वासने देऊन पून्हा एकदा फसवले आता पून्हा जनता फसणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. त्­याचाच परिणाम आजच्या सभेला मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादातून दिसून आले आहे. साधनसुचीतेच्या गप्पा मारणारे शेतकरी, महिला, युवक या सर्वांचा भ्रमनिरास केला आहे. भृष्टाचा-याला संरक्षण दिले हे आता स्पष्ट झाले आहे. या परिस्थितीत सत्ताधारी बदलणे हाच पर्याय राहीला आहे. या बदलाची सुरुवात लातूरपासून व्हायला हवी, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील व महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांनी शुक्रवारी लातूरात लक्षवेधी विशाल मिरवणूक काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर त्यांच्या प्रचाराची शुभारंभ सभा झाली. त्याप्रसंगी अध्यक्षीय समारोप करताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख बोलत होते.  या सभेस काँग्रेस पक्षाचे नेते खासदार चंद्रकात हंडोरे, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे, साहित्सरत्न अण्णा भाऊ साठे यांचे पणतू सचिन साठे, उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, माजी आमदार रोहीदास चव्हाण, माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरे, प्रा. यशपाल भिंगे, लोहा-कंधारचे आशाताई शामसुंदर शिंदे यांच्यासह व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना माजी मंत्री दिलीलपराव देशमुख म्हणाले, लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेस महाविकास आघाडीच्या प्रचाराची एक फेरी पूर्ण झाली आहे. वातावरण चांगले बनले आहे असे समजून कार्यकर्त्यांनी मात्र स्वस्थ बसू नये, प्रत्येक बुथवरुन १०० मताचे मताधिक्य मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी काम केल्यास डॉ. शिवाजी काळगे यांचा २ लाखापेक्षा अधिकच्या मतांनी विजय होईल असेही ते म्हणाले.
उमेदवारी कोणाला मिळाली हे न पाहता संविधानाच्या  रंक्षणासाठी बदल घडवा
अबकी बार ४०० पार असा नारा देऊन भाजपा देशाचे संविधान बदलण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे देशाची लोकशाही आणि ७५ वर्षापासून देशाला प्रगतीपथावर नेणारे राज्यघटनेचे संरक्षण करण्यासाठी या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडी काँग्रेस उमेदवाराच्या पाठीशी जनतेने शक्त्ती उभी करावी, असे आवाहन खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे.
उमेदवारी कोणाला मिळाली यापेक्षा देशाचे संविधान वाचवायचे, देशाची लोकशाही टीकवायची हा विचार करुन महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करावे असेही खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी म्हटले आहे. आदरणीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना मला सामाजिक न्यायमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली.  याकामाची जाणीव ठेऊन मतदारांनी काँग्रेस महाविकास आघाडी उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन चंद्रकांत हंडोरे यांनी केले आहे.
मनुस्मृती आणण्याचे मनसुबे  उधळण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी शक्त्ती  उभी करा भ्रष्टाचा-यांना संरक्षण देणा-यांना धडा शिकवण्यासाठी संविधान बदलून मनुस्मृती आणण्याचे मनसुबे उधळण्यासाठी या लोकसभा निवडणूकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना जनतेने निवडूण दयावे, असे आवाहन उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी या सभेत बोलतांना केले. समतेचा विचार सांगणारा मतात फूट पाडण्यासाठी दिशाभूल करणा-यांना त्यांची जागा दाखवून दया असे आवाहनही त्यांनी केले.
अहमदपूर मतदारसंघातून  आम्ही ६९ हजारापेक्षा  अधिकचे मताधिक्य देऊ
माजी मंत्री विनायकराव पाटील म्हणाले की, ही निवडणूक जनतेने स्वत:च्या हातात घेतली आहे. आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे निवडून येणार आहेत. या निवडणूकीत अहमदपूर मतदारसंघातून आम्ही ६९ हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य देऊ. लातूर जिल्ह्यात भाजपची अवस्था बिकट आहे, विद्यमान भाजप खासदाराने आजी आमदाराला, माजी आमदार केले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वत: उमेदवार आहे, असे समजून काम करावे, भाजपला जिल्ह्यातील कोणत्याही गावात लोक येऊ देत नाही, त्यांनी जिल्ह्यात शेतक-याला पीक विम्याची पैसे मिळू दिले नाहीत, टेंडर काढून जिल्ह्यात भाजप नेते कमिशन खातात, असे सांगून लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करावे. असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस पक्षाने या निवडणूकीत देशातील जनतेला पाच न्यायाची गॅरटी दिली आहे. या पाच न्यायाची गॅरटीचे प्रतिनीधीत्व करणा-या शेतकरी तुळशीराम भोसले, सुशिक्षीत युवक कृष्णत्त कदम, गरीब कुटूंबातील महीला उषा राठोड, मजूर सयानंद गायकवाड आणि मागास समाजातील व्यक्ती धनराज कांबळे यांच्या हस्ते आज व्यासपीठावर श्रीफळ वाढवून डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याची भूमिका घेऊन समतेच्या विचाराने एकत्रित आलेल्या डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचार शुभारंभ सभेच्या व्यासपीठावरील महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या नेत्यांना भव्य अशा पुष्पहाराने एकत्रित गुफण्यात आले. महाविकास आघाडीतील आम्ही सर्वजण एक आहोत जिददीने लढणार आहोत हे सांगणारे चित्र प्रचार यंत्रणेतील कार्यकर्त्याचा उत्साह वाढविणारे होते. या प्रचार शुभारंभ सभा प्रसंगी प्रारंभी सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना संवीधान भेट देण्यात आली.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे उमेदवारी अर्ज दाखल करून भव्यदीव्य मिरवणुकीने व्यासपीठावर दाखल झाले तेव्हा उपस्थित जनसमुदायाने त्यांचे जोरदार आणि उत्स्फुर्त स्वागत केले. यावेळी काँग्रेस पक्ष आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, डॉ. शिवाजी काळगे व विविध नेत्यांच्या विजयाच्या घोषणानी परीसर दुमदुमून गेला होता. या सभेत प्रा. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे स्टार प्रचारक यशवंत गोसावी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, आशा श्यामसुंदर शिंदे, सचिन साठे यांनी भाषणे केली. यावेळी  लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राज्य संघटक एकनाथ पवार, पप्पू कुलकर्णी, शेतकरी कामगार पक्षाचे उदय गवारे, अभय साळुंखे, मोईज शेख, जगदीश बावणे, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर दीपक सुळ, डॉ. अशोक पोद्दार, संतोष देशमुख, विजय देशमुख, अजित माने, हमीद शेख, रवींद्र काळे, अशोक गोविंदपुरकर, विकास कांबळे, रविशंकर जाधव, गणेश एसआर देशमुख, माजी महापौर स्मिता खानापुरे, अमर खानापुरे, यशवंतराव पाटील, मोईज शेख, सपना किसवे, एकनाथ पाटील, लक्ष्मण कांबळे, सुनीता आरळीकर, सिराज जहागीरदार, विष्णूपंत साठे, सादिक सय्यद, राम स्वामी, अ‍ॅड. फारुक शेख, अ‍ॅड. श्रद्धा जवळगेकर, प्रताप भोसले, बेंजामिन दुप्ते, मारुती पांडे, मनीषा कोकणे आदींसह  महाविकास आघाडीचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते, व्यापारी, व्यावसायिक, महिला, मजूर  हजारोंच्या संख्येने होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिनेश नवगिरे, सचिन सूर्यवंशी, गोंिवद केंद्रे यांनी केले तर शेवटी आभार लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR