38.3 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरउजनी जलवाहिनीची सहा ठिकाणची दुरुस्ती पूर्ण, नियमित उपसा झाला सुरू

उजनी जलवाहिनीची सहा ठिकाणची दुरुस्ती पूर्ण, नियमित उपसा झाला सुरू

सोलापूर : उजनी ते सोलापूर जलवाहिनीची सहा ठिकाणची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. उजनी पंपहाउसमधून नियमित पाणी उपसा सुरू आहे. औज बंधारा कोरडा असून टाकळी इनटेकवेलमध्ये चार दिवस पुरेल इतकेच पाणी आहे. शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी केले.

उजनी जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी महापालिकेने शनिवारी शटडाऊन घेतले. शनिवारी सकाळी १०:३० वाजता उजनी पंपहाउस बंद करण्यात आले. उजनी जलवाहिनीला बाळे उड्डाणपूल, वडवळ, भुईंजे गाव, वेणेगाव, उजनी गाव, उजनी हेडवर्क अशा सहा ठिकाणी गळती लागली होती. ही गळती बंद करण्यासाठी पाइपलाइनला वेल्डिंग करण्यात आले. सहा ठिकाणची कामे एकाच दिवसात पूर्ण झाली. सहायक अभियंता सिद्धेश्वर उस्तुरगीव त्यांचे सहकारी दिवसभर कामाच्या ठिकाणी तळ ठोकून होते. रविवारी आणि सोमवारी उजनी पंपहाउसमधून सुरळीत पाणीपुरवठा झाला.

शहरात सध्या पाच दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले आहे. हे पाणी सोमवारी सकाळी मंगळवेढा तालुक्यातील माचणूरमध्ये पोहोचले होते. बुधवारी दुपारपर्यंत पाणी औज बंधाऱ्यात येण्याची शक्यता आहे. तोपर्यंत शहरात पाच दिवसांआड पाणीपुरवठा होईल. बंधारा भरून घेतला की पुन्हा चार दिवसांआड पाणीपुरवठा होणार आहे. आणिदुबार पंपिंगसाठी पाइप टाकले उजनी धरणात सध्या वजा २५ टक्क्के पाणीसाठा आहे. धरणातून नदीत पाणी सोडले आहे.

पाणी पातळी खाली जाणार आहे. धरणाची पाणी पातळी वजा ३५ टक्के झाली की दुबार पंपिंग करावे लागते. महापालिकेचे सहायक अभियंता संतोष यलगुलवार आणि सहकाऱ्यांनी धरणावर दुबार पंपिंगसाठी पाइप टाकून घेण्याचे काम सुरु केले आहे. २५ मार्चनंतर पंपिंग सुरू होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR