40 C
Latur
Sunday, April 28, 2024
Homeसोलापूरमनपा आयुक्तांन केले प्रमुख अधिकाऱ्यांना नव्याने खाते वाटप

मनपा आयुक्तांन केले प्रमुख अधिकाऱ्यांना नव्याने खाते वाटप

सोलापूर : महापालिकेतील विविध विभागांतील कामांचे नियोजन करण्यासाठी आयुक्त शीतल तेली-उगले यांनी प्रमुख अधिकाऱ्यांकडे नव्याने खाते वाटप केले आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे शहर सुधारणा, पाणीपुरवठा विभागाचे काम सोपविण्यात आले आहे.

मनपाचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त विद्या पोळ यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या जागी नव्याने अधिकारी रुजू झालेले नाहीत.
सहायक आयुक्त म्हणून गिरीश पंडित यांची नियुक्ती झाली आहे. त्यामुळे विविध विभागांच्या कामकाजाचे पुनर्विलोकन करून विभागांचे वाटप करण्यात आले आहे.

मनपा उपायुक्त्त आशिष लोकरे यांनी मालमत्ता कर वसुली विभागाचे चांगले नियोजन केल्याची चर्चा आहे. लोकरे यांच्याकडे मालमत्ता कर विभाग (शहर, शहर हद्दवाढ, गवसु), सामान्य प्रशासन विभाग, भूमी व मालमत्ता विभाग, जन्म-मृत्यू विभाग व विवाह नोंदणी कार्यालय, आरोग्य विभाग, मलेरिया विभाग, भांडार विभाग.असे विभाग देण्यात आले.

सहायक आयुक्त भोसले यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग, मंडई (कोंडवाडा) व लायसन विभाग, भूमी व मालमत्ता विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, वाहन विभाग. सहायक आयुक्त ज्योती भगत यांच्याकडे पर्यावरण विभाग, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण विभाग, प्राणी संग्रहालय व पशू वैद्यकीय विभाग, महिला व बालकल्याण विभाग, विधान सल्लागार.विभाग आहेत.

अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर सुधारणा विभाग प्रकल्प अधिकारी, पाणीपुरवठा विभाग व ड्रेनेज विभाग, प्राणी संग्रहालय व पशू वैद्यकीय विभाग, विभागीय कार्यालय क्र. ५,६, ७ व ८, ५, मंडई (कोंडवाडा) व लायसन विभाग, आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग, विद्युत विभाग, नगर सचिव विभाग, संगणक विभाग, विधी विभाग, जनगणना कार्यालय आदी.

उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य विभागव घनकचरा व्यवस्थापन विभाग, सुरक्षा विभाग, अभिलेखापाल कार्यालय, क्रीडा व सांस्कृतिक विभाग, विभागीय कार्यालय क्र. १,२,३ व ४, परिवहन विभाग, निवडणूक कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग, कामगार कल्याण व जनसंपर्क कल्याण विभाग, कार्यालय पर्यावरण विभाग, कार्यालय व दिव्यांग यू.सी.डी. एनयूएलएम यासह उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण, शिक्षण मंडळ व प्रशाला, अतिक्रमण विभाग, वाहन विभाग.देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR