38.5 C
Latur
Wednesday, May 8, 2024
Homeमहाराष्ट्रसरकार विशेष अधिवेशन बोलावणार?

सरकार विशेष अधिवेशन बोलावणार?

वर्षावर बैठक, उपमुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

मुंबई : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून, आता यावर तोडगा काढण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे हेही उपस्थित होते. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याबाबत मंथन केल्याचे समजते. तसेच उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावल्याने त्याबाबतही मंथन करण्यात आल्याचे समजते.

सरकारकडून उद्या सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राज्यात कायदा व सुव्यवस्था आटोक्यात राहिल, यासाठी विरोधीपक्षांकडून सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ शकते. त्यासंदर्भातही या बैठकीत चर्चा झाली असावी.
या अगोदर सोमवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चेसाठी दाखल झाले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांच्यात बैठक झाली. मराठा आरक्षणाबाबतच्या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आव्हान सरकारसमोर आहे. बैठकीत काही निर्णय होईल का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

कुणबी प्रमाणपत्राबाबत
सरकारी आदेश जारी
निजामकालीन पुरावे सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्रे देण्यासंबंधीचा सरकारी आदेश निघाला आहे. त्यानुसार आता कुणबी जात प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR