38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरकाँग्रेसचा देश विकासाचा जाहीरनामा घरोघरी पोहचवा

काँग्रेसचा देश विकासाचा जाहीरनामा घरोघरी पोहचवा

लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकांमध्ये जाऊन, लोकांना काय हवे आहे. हे जाणून घेऊन लोकांच्या मनातील जाहीरनामा तयार केला आहे. देशाचा, देशातील सर्वसामान्य माणसांचा विकास साधणारा हा जाहीरनामा आहे. तो आपल्या सर्वांच्या हिताचा आहे. या जाहीरनाम्याचे घरोघरी वाचन झाले पाहिजे. यासाठी प्रत्येकाच्या घरापर्यंत काँग्रेसचा जाहीरनामा पोहचवा, असे आवाहन ‘लातूर ग्रामीण’चे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी शनिवारी (दि. १३) केले.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघांमध्ये आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमाने सुरू आहे. संवाद बैठकांबरोबरच आता घरोघरी स्रेहभेटी घेऊन काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांचा प्रचार केला जात आहे. लातूर तालुक्यातील सोनवती, सारोळा येथे जाऊन आमदार धिरज देशमुख यांनी ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला. तत्पूर्वी, भातखेडा, चिकलठाणा, कासारखेडा, खुलगापूर, मळवटी, धनेगाव येथे जाऊन ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्त्यांंची स्रेहभेट घेत त्यांच्याशी संवाद साधला.
आमदार धिरज देशमुख म्हणाले की, भाजप सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव कमी करण्याऐवजी दुप्पट, तिप्पट केले आहेत. सोयाबीनचे भाव वाढविण्याऐवजी कमी केले आहेत. उच्चशिक्षीतांना रोजगार दिला नाही. व्यापा-यांंना जाचक अटी घालून अडचणीत आणले. भाजपने गेल्या दहा वर्षात लोकांना आश्वासनांची खोटी भूरळ घालून फसवले पण, काँग्रेसला खोटी आश्वासने देणे जमत नाही. त्यामुळेच काँग्रेसने आपल्या कार्यकाळात देशाचा कृषी, औद्योगिक, विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रासह सर्वांगीण विकास केला. पायाभूत सुविधा मजबूत केल्या. आपत्तीत शेतक-यांंची कर्जमाफी केली. सर्वसामान्य, गोरगरीब, बहुजनांचा हात कधीच सोडला नाही. यापुढेही सोडणार नाही.
याप्रसंगी शिवसेनेचे नेते पप्पू कुलकर्णी, अनुप शेळके, सुभाष घोडके, राजकुमार पाटील, सुनिल पडिले, प्रताप पाटील, प्रवीण पाटील, धनराज दाताळ, शंकर बोळंगे, मनोज पाटील, युवराज जाधव, पंडित ढमाले, संभाजी रेड्डी, ज्ञानोबा गवळे, बादल शेख, रघुनाथ शिंंदे, शिवाजी देशमुख, आविष्कार गोजमगुंडे, अंगदराव पाटील, शिवाजी जाधव, श्रद्धा जवळगेकर, रामेश्वर हालके, राहूल मातोळकर, संजय रणखांब, कमलाकर शिंंदे, अंगद वाघमारे, भालचंद्र पाटील, विनोद बडगीरे, हरप्रिसाद निटुरे, संतोष कुटवाडे, नामदेव पाटील भास्कर पाटील, मधुकर शिंंदे, बालाजी सुरवसे, तानाजी मस्के, किशोर सूर्यवंशी, तुकाराम जाधव, सुभाष माने, पी. के. जाधव-देशमुख, विश्वांभर मुळे, महादेव इंगळे, त्र्यंबक रणखांब, विश्वासराव कुलकर्णी, सिद्धार्थ सोनवणे, श्रीकांत बैले यांच्यासह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR