28.1 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूर१ लाख ८० हजारांचा दारुसाठा औराद हद्दीत जप्त

१ लाख ८० हजारांचा दारुसाठा औराद हद्दीत जप्त

निलंगा : प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने  कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठांच्या आदेशाने औराद पोलीस ठण्याच्या वतीने विशेष पथक नेमून औराद हद्दीमध्ये अवैधरित्या विक्री करणा-या दारू विक्रेत्यावर धाड टाकून एक लाख ८० हजारांच्या मुद्देमालासह आरोपींना गजाआड करण्यात आले आहे .
      जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल दुरपडे यांच्या नेतृत्वाखाली औराद पोलीस ठाण्याच्या वतीने विशेष पथक नेमून औराद शहाजनी हद्दीतील औराद शहाजनी , हलगरा, बोटकुळ, अंबुलगा ठिकाणी छापे मारून ७ व्यक्तीच्या विरोधात अवैध दारू विक्रीबाबत ५ गुन्हे दाखल करून  अवैध दारूसह ३ दुचाकीसह एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पथकामध्ये सपोनि विठ्ठल  दुरपडे, पीएसआय गोपाळ शिंंदे , श्रीनिवास चिटबोने, मोरे, काळे , महिला पोलीस शेख यांचा समावेश होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR