34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeमुख्य बातम्या काँग्रेसची चौथी यादी जाहीर

 काँग्रेसची चौथी यादी जाहीर

नवी दिल्ली : कॉँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी आपली चौथी यादी जाहिर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील दोन जागांचा समावेश आहे. यात जालन्यातून काँग्रेसने डॉ. कल्याण काळे यांना तर धुळ्यातून डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे. याची माहिती राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या अधिकृत एक अकाउंटवरुन देण्यात आली.
डॉ. कल्याण काळे हे छ. संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री, विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. आता जालना लोकसभा मतदारसंघातून ते भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना टक्कर देणार आहेत.
जालना लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सलग ५ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे डॉ. काळेंसाठी ही लढाई सोपी नसणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR