30 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरचेअरमन वैशालीताई देशमुख यांच्याकडून सुडे कुटुंबियांचे सांत्वन

चेअरमन वैशालीताई देशमुख यांच्याकडून सुडे कुटुंबियांचे सांत्वन

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील कन्या व पुणे येथील अभियांत्रीकी महाविदयालयामध्ये शिक्षण घेत असलेली भाग्यश्री सूर्यकांत सुडे हीचा मृत्यु झाला होता त्याबद्दल सूर्यकांत सुडे कुटुंबाची विलास सहकारी  साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख  यांनी सोमवार दि. १५ एप्रिल  रोजी हरंगुळ येथील निवासस्थानी जाऊन सुडे कुटूंबाची भेट  घेऊन त्यांचे सांत्वन केले, त्यांना धीर दिला.  यावेळी चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांनी झालेली घटना दुर्दैवी असून या बाबत दु:ख व्यक्त केले. यावेळी सुर्यकांत सुडे, डॉ. सारीका देशमुख,  संगीता मोळवणे, सोनाली थोरमोटे  व सुडे कुटुंबीय आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR