38.3 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरमाजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटीगाठी

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतल्या नागरिकांच्या भेटीगाठी

लातूर : प्रतिनिधी
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सोमवार दि.१५ एप्रिल रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिका-यासह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या.
याप्रसंगी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हा. चेअरमन समद पटेल,  एकनाथ पाटील, माजी मनपा  सदस्य सचिन बंडापले, मोहन सुरवसे, हरिभाऊ गायकवाड, पत्रकार राम जेवरे, आदिवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष रामराजे आत्राम, साहेबअली सौदागर, मकबूल शेख वलांडीकर, अंगद सूर्यवंशी, सूर्यभान पाटील, पत्रकार  हारून मोमीन, पत्रकार सालार शेख, पत्रकार सलीम शेख, पत्रकार खय्युम शेख, अभिषेक पतंगे, विष्णुदास धायगुडे, विजयकुमार धुमाळ, विश्वनाथ कोळसुरे, रामदास धावणे, गोविंद हलसे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध  पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR