38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरतोडलेल्या झाडांच्या फांद्या तशाच पडून,वाहनधारकांची त्रेधातीरपीट

तोडलेल्या झाडांच्या फांद्या तशाच पडून,वाहनधारकांची त्रेधातीरपीट

सोलापूर : देखभाल व दुरुस्तीच्या नावाखाली शहरात महावितरणकडून लाईटच्या तारांना स्पर्श करणारी झाडे तोडण्यात येत आहेत; मात्र तोडलेल्या झाडांच्या फांद्या रस्त्यावर तशाच पडून राहत असल्याने हजारो वाहनधारकांना धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागत आहे. दरम्यान, अनेकांना याच कारणामुळे जीवही गमवावा लागत असल्याचे चित्र सोलापुरात दिसून येत आहे

दरम्यान, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यात महावितरणचे नुकसान होऊ नये व लाईटच्या तारा तुटू नये यासाठी मागील पंधरा दिवसांपासून शहरात महावितरणचे कर्मचारी लाईटच्या तारांना स्पर्श करणारी झाडे तोडण्याचे काम करीत आहेत. यासोबतच उपकेंद्र, वीज खांब, वीज वाहिन्या, रोहित्राशी संबंधित कामे करण्यात आली आहेत.

उपकेंद्रातील आर्थिंगची दुरुस्ती केली असून, लघुदाब व उच्चदाब वीजवाहिन्यांना स्पर्श करणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे. उच्चदाब व लघुदाब गाळ्यातील सैल वीजतारा ओढण्याचे काम सुरू असून जीर्ण वीज वाहिन्या बदलण्यात येत आहेत. नादुरुस्त सर्व्हिस वायर बदलल्या असून, रोहित्रांची आर्थिंग तपासणी व दुरुस्ती केली आहे. शिवाय धोकादायक वीजखांब बदलून नवीन उभारण्यात आले असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.

झाडाच्या फांद्या तोडल्यावर त्या वेळीच हटवल्या जात नाहीत. त्यामुळे वाहतूक रोखली जाते.
देखभाल दुरुस्तीसाठी विजेच्या तारांना स्पर्श होत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्या तोडल्यानंतर महापालिकेच्या मदतीने त्या फांद्यांची विल्हेवाट लावली जाते. या कामात महापालिकेची मोठी मदत होते; मात्र मागील काही दिवसांपासून या कामात हयगय होत असल्याचे दिसून येत आहे.

शुक्रवारी होटगी रोडवरील गांधी नगर, सात रस्ता परिसरातील व्हीआयपी मार्ग, कुमठा नाका, गुरुनानक नगर, अंत्रोळीकर नगर आदी भागातील झाडाच्या फांद्या तोडण्यात आल्या, मात्र तोडल्यानंतर त्या फांद्या तशाच पडून असल्याचे व झाडांच्या फांद्या तारांवरच लोंबकळत असल्याचेही दिसून आले.

झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर महापालिकेच्या मदतीने ती तोडलेली झाडे योग्य त्या ठिकाणी टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये यासाठी आम्ही प्रयल करीत आहोत. ज्या भागात असा प्रकार घडत असेल तर आम्ही योग्य ती काळजी घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांना सक्त सूचना करु.असे सोलापूर शहर कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR