38.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरउन्हाळीसुट्यांमुळे एस.टी स्थानके गजबजू लागली

उन्हाळीसुट्यांमुळे एस.टी स्थानके गजबजू लागली

सोलापूर : दहावी आणि बारावीच्या परीक्षा झाले आहेत. शिवाय, सगळ्याच शाळांना उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या आहेत. यामुळे मामाच्या गावाला जाणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे एसटी स्थानके आता गजबजू लागली आहेत. ऐन दुपारी स्थानकात शेकडो लोक एसटीची वाट पाहत थांबलेले असतात. यात महिला आणि लहान मुले व वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी भर पडत आहे.

राज्य परिवहन महामंडळाकडून उन्हाळ्याच्या सुटीसाठी जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. यामुळे गावी जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर होत आहे, पण प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने याचा फायदा एसटीला होत आहे. यामुळे एसटीच्यादररोजच्या उत्पन्नात भर पडत आहे. शिवाय, सध्या शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला, मुले, ज्येष्ठ नागरिक शिवाय दिव्यांगांना विविध योजनांच्या माध्यमातून सवलती दिल्या जात आहेत. यामुळे एसटीकडे कमी झालेला ओढा आता वाढू लागला आहे. यामुळे प्रवाशांच्या एसटीकडून अपेक्षाही वाढल्या आहेत. यामुळे एसटी प्रशासनाकडूनही जादा गाड्या सोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय, जादा गाड्यांसोबत सगळ्या गाड्या वेळेवर धावाव्यात, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, सोलापूर आगाराचे उत्पन्न तेरा ते चौदा लाखांपर्यंत होते. पण दररोज प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. यामुळे एसटीचे उत्पन्न ही वाढत आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून एसटीचे उत्पन्न हे दीड ते दोन लाखांनी वाढले आहे. सध्या साडेसोळा लाखांपर्यंत उत्पन्न वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या प्रवाशांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येत आहेत. यामुळे अनेक गाड्यांच्या देखभालीसाठी क्वचितच वेळ राहत आहे, पण या वेळेतही प्रत्येक एसटी गाड्या या स्वच्छ असायला हव्या यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

सध्या एसटी स्थानकात गर्दी वाढली आहे. यामुळे स्थानकात काहीवेळा घाण झाल्याचे पाहायला मिळते. पण तेथील स्थानक स्वच्छ राहावे यासाठी प्रशासनाकडून वारंवार स्वच्छता केली जात आहे. यामुळे स्थानकात सध्या प्रत्येक काही तासांनंतर स्वच्छता करण्यात येत आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.सध्या प्रवाशांची संख्या वाढत आहे. यामुळे त्यांच्या सोयीसाठी अनेक मार्गावर जादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. यामुळे एसटीचे उत्पन्नहीं वाढत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR