31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeलातूरदेशाची राज्य घटना वाचविणे काळाची गरज: अ‍ॅड. फारुक शेख 

देशाची राज्य घटना वाचविणे काळाची गरज: अ‍ॅड. फारुक शेख 

लातूर : प्रतिनिधी
राज्य घटनेने दिलेल्या अधिकारामुळे आज जे सत्तेत आहेत तेच राज्य घटना बदलण्याचा छुपा अजेंडा राबवित आहेत. राज्य घटना सुरक्षीत नाही राहिली तर देशात अराजकता माजेल. त्यामुळे देशाची राज्य घटना वाचविणे काळाची गरज आहे, असे मत लातूर शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. फारुक शेख यांनी व्यक्त केले.
लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ लातूर शहर जिल्हा अल्पसंख्यांक काँग्रेसच्या वतीने दि. २४ एप्रिल रोजी येथील गरुड चौकात संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी अ‍ॅड. शेख बोलत होते.  पुढे बोलतना अ‍ॅड. शेख म्हणाले, देशाची राज्यघटना वाचनासाठी तसेच देशाचे संरक्षण करण्यासाठी व महागाईला रोखण्यासाठी व देशात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांना विजयी करावे, असे आवाहन केले.
या वेळी मैनोद्दिन शेख, पाशा मुल्ला, रोहित वडुरले, विश्वनाथ मदने, बबलू चव्हाण, आकाश सूर्यवंशी, दिनेश सूर्यवंशी, विश्वंभर तेलंग, गणेश रकटे, जितेंद्र रायबोले, प्रमोद चव्हाण, जनाबाई कांबळे, सुनिता शंकाफुले, कांता रकटे, सविता सूर्यवंशी, ललिता सूर्यवंशी, सुंदराबाई सकट, वीर सकट यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR