31.7 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरमहाविजयासाठी ‘माझे बूथ, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घ्या

महाविजयासाठी ‘माझे बूथ, माझी जबाबदारी’ मोहीम हाती घ्या

लातूर : प्रतिनिधी
लातूर लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्यासाठी अत्यंत सकारात्मक वातावरण आहे. या वातावरणाला मोठ्या विजयात रुपांतरीत करण्यासाठी सर्व पदाधिकारी, बुथ प्रमुखांनी प्रत्येक मतदारांपर्यंत गेले पाहिजे. काँग्रेसचा जाहीरनामा (न्याय पत्र) प्रत्येकापर्यंत पोचवला पाहिजे. प्रत्येक बुथवरील मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत जाण्यासाठी जनजागृती करा, असे आवाहन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.
लातूर येथे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि बुथ प्रमुख यांचा मेळावा लातूर येथे बुधवार दि. २४ एपिल्र रोजी आयोजित करण्यात आला होता. काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी कोळगे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, आबासाहेब पाटील, अमर खानापुरे, सर्जेराव मोरे, शाम भोसले, यशवंतराव पाटील, अनंतराव देशमुख, उमाकांत खलंग्रे, सुभाष घोडके, प्रमोद जाधव, अनुप शेळके, सुनील पडिले, रमेश सूर्यवंशी, सचिन दाताळ, प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, पूजा इगे, दैवशाला राजमाने, तुषार रईसा, रुपेश पाटील उपस्थित  होते.
आमदार धिरज देशमुख म्हणाले, काँग्रेसने देशाचा सर्वांगीण विकास केला. सर्वसमावेशक विकासाचा विचार हाच काँग्रेसचा ब्रँड आहे. सर्वांना सोबत घेवून काँग्रेस पुढे जात आहे. काँग्रेस कामाच्या बळावर मत मागते. आश्वासनांच्या बळावर मत मागत नाही. त्यामुळे काँग्रेसने केलेले काम आपण सर्वांनी घरोघरी पोचवले पाहिजे. लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा विचार रुजला, वाढला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण जिंकण्यासाठी ही निवडणूक लढतोय. त्यामुळे पूर्ण तयारीने प्रचार यंत्रणा राबवावी, असे आवाहन ही त्यांनी केले.  यावेळी डॉ. शिवाजी काळगे, अमर खानापूरे, रुपेश पाटील, तुषार रईसा यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनुप शेळके यांनी केले. सुत्रसंचालन दिनेश नवगिरे यांनी  तर सुभाष घोडके यांनी आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR