36.4 C
Latur
Saturday, April 27, 2024
Homeसोलापूरनैसर्गिक थंड पाण्यासाठी मातीच्या डेऱ्याला पसंती

नैसर्गिक थंड पाण्यासाठी मातीच्या डेऱ्याला पसंती

पंढरपूर—उन्हाचा पारा वाढू लागताच थंड पाण्याच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे. बाटलीबंद पाण्याच्या जमान्यात आता नैसर्गिक थंड पाण्यासाठी नागरिक मातीच्या डेर्‍याला पुन्हा पसंती देत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील तापमान वाढायला सुरवात झाली आहे. होळीने थंडी संपवली आहे. त्यामुळे कमाल तापमानात वरचेवर वाढ होत आहे. गरिबांचा फ्रीज म्हणून डेर्‍याची ओळख आहे. परंपरागत पाणी थंड करण्याचे हे साधन काळाच्या ओघात मागे पडले होते.

फ्रीज, जार व बाटलीबंद पाण्याचे दुष्परिणाम लक्षात येताच पुन्हा लोक जुनं तेच सोनं म्हणून माठाची मागणी करू लागले आहेत. शहरात नवीन स्टाइलचे माठ तर ग्रामीण भागात जुन्या परंपरेतील आकाराचेच डेरे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यंदा डेऱ्याच्या किमतीत सुमारे १० टक्के वाढ झाल्याचे व्यावसायिक व डेरा व्यापार्‍यांनी सांगितले, डेरा सुमारे २०० ते २५० रुपये प्रतिनग या दराने विकला जातोय. डेऱ्यामुळे वीजबिल येत नाही. केवळ अडीचशे रुपयांत संपूर्ण उन्हाळ्यात नैसर्गिक थंड झालेले पाणी पिण्यासाठी मिळते.त्यामुळे लोक आता पिण्याच्या पाण्यासाठी गावोगावी नवीन डेरे खरेदी करू लागले आहेत.

बाटलीबंद पाणी वाहतुकीत गरम झाले तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जार किंवा फ्रीजमधील अतिथंड पाण्याचाही त्रास होतो. त्यामुळे उन्हाळ्यात माठातील स्वच्छ पाणी पिणे आरोग्यासाठी उत्तम राहते. माठातील पाणी घेण्यासाठी त्याला तोटी बसवून त्यातून पाणी घेतले तर सर्वात जास्त चांगले असते. फ्रीजमधील अतिथंड पाण्यामुळे घशाचे आजार होतात. तर डेर्‍यात थंड झालेले पाणी आरोग्यासाठी चांगले असते. मात्र त्याचा टीडीएस ३०० च्या आत असणे गरजेचे असते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR