35 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeलातूरपरीक्षा शुल्­क व शिष्­यवृत्ती योजनेचा प्राप्­त निधी खर्च

परीक्षा शुल्­क व शिष्­यवृत्ती योजनेचा प्राप्­त निधी खर्च

लातूर : प्रतिनिधी
जिल्­हा वार्षिक नियोजनातील सन २०२२-२३ मधील प्राप्­त निधी जिल्­हा परिषदेतील समाज कल्­याण विभागाने १०० टक्­के खर्च केला असून प­रीक्षा शुल्­क व सावित्रीबाई फुले शिष्­यवृत्­ती योजनेअंतर्गत ३३ लाख ५ हजार ६२५ रुपये निधी खर्च करण्­यात आला आहे. जिल्­हा परिषदेचे मुख्­य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, अति. मुख्­य कार्यकारी अधिकारी अस्­लम तडवी यांनी वेळोवेळी बैठका घेवून हा निधी पात्र विद्याथ्­र्यांना मिळावा यासाठी प्रयत्­न केले आहेत.
 पात्र विद्यार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षताही घेण्­यात आलेली  आहे.  यासह तालूकास्­तरावरही शिबीरांचे आयोजन करुन प्रस्­तावांचे संकलन करण्­यात आले आहे. या योजनेचे उद्दिष्­ट मुलींचे गळतीचे प्रमाण कमी करणे, गुणवंत विद्यार्थींनीना प्रोत्­साहन देणे तथा गरजू विद्यार्थींनीना लेखन तसेच शैक्षणिक साहित्­य  खरेदी करणे शक्­य व्­हावे अशी आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR