37.6 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरभीमा नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले,पीके करपली

भीमा नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले,पीके करपली

पंढरपूर : भीमा नदीपात्र कोरडे ठणठणीत पडले आहे. पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली आहेत. उजनी धरणाच्या पाण्याचे नियोजन न झाल्याने ऐन उन्हाळ्यात धरणाची पाणीपातळी मायनसमध्ये गेली. शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून वाढवलेली पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. सुस्ते, तारापूर, बिटरगाव, अजनसोंड, खरसोळी, विटे पोहरगाव या गावात प्रामुख्याने ऊस पीक करपू लागली आहेत. परिणाम जनावरांच्या चा-याचा प्रश्न निर्माण होत असून त्याचा दुधावरही परिणाम होत आहे.

गेल्या वर्षी मायनस ४० टक्के असलेले उजनी धरण या वर्षी पावसाळ्यात प्लस ६० टक्के भरले. या वर्षी कॅनॉलला साडेतीन महिने उजनीतून पाणी सोडण्यात आले होते. प्रत्येक वर्षी उजनी धरणातून पाणी
सोडण्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ येत होती. मात्र या वेळी कॅनॉलचे पाणी बंद करण्यासाठी आंदोलन करण्याची शेतकऱ्यावर वेळ आली.

सोलापूर व पंढरपूरला पिण्यासाठी भीमा नदीतून पाणी सोडले होते. उजनीतून सोडलेले पाणी सोलापूरला पोहोचेपर्यंत नदीकाठचा विद्युतपुरवठा दोन तास ठेवण्या आला. काही दिवसांनी चार तासांव विद्युतपुरवठा केला. त्यामुळे शेतातील उभी पिके पाण्याअभावी जळून गेली.उजनीत ६० टक्के पाणीसाठा असताना पावसाळ्यात साडेतीन महिने कॅनॉलला गरज नसताना पाणी सोडले. त्यामुळे उजनीतील पाणीसाठा कमी झाला. प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना पाणी सोडण्यासाठी आंदोलन करावे लागायचे मात्र या वेळेस कॅनॉलचे पाणी बंद करण्यासाठी आंदोलन करावे लागले.

दुष्काळ हा मानवनिर्मित असून प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. पीक नुकसानीला उजनी प्रशासन जबाबदार आहे.असे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. सोलापूर जिल्ह्यावरचा दुष्काळ हा मानवनिर्मित दुष्काळ आहे. गेल्या वर्षी मायनस ४० टक्के असलेले उजनी धरण या वर्षी पाऊस कमी झाला असला तरी उजनीच्या पाणलोट क्षेत्रात परतीच्या पावसाने चांगला दिलासा दिला. उजनी मायनस ४० टक्के मधून प्लस ६० टक्के झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR