34.3 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरउत्पन्नवाढीसाठी महापालिका देणार शहरातील मालमत्ता भाड्याने

उत्पन्नवाढीसाठी महापालिका देणार शहरातील मालमत्ता भाड्याने

सोलापूर: महापालिका प्रशासन शहरातील विविध ठिकाणच्या मालमत्ता भाड्याने देणार आहे. उत्पन्न वाढीसाठी शहरातील एक खुल्या जागाही भाड्याने देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
शहरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक बांधलेल्या मालमत्ता व खुल्या जागा वापराविना पडून आहेत. शहरातील अनेक जागा व मालमत्तांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अनेक ठिकाणी या मालमत्तांचा व खुल्या जागेचा गैरवापर राजरोस सुरू होता व आजही होत आहे.

याबाबत ‘सकाळ’ने आपल्या अंकातून वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करत महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याबाबत विचार करून शहर व परिसरातील विडी घरकुल येथील सांस्कृतिक भवन,तुळजापूर बेस कन्नड मुलींची शाळा क्र.५,अक्कलकोट रोड पाणीटाकी अभ्यासिका,सिद्धेश्वर पेठेतील जागा अशा एकूण चार मालमत्ता व एका ठिकाणची खुली जागा भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरातील विडी घरकुल, तुळजापूर वेस, अक्कलकोट रोड पाणी टाकी परिसर व भवानी पेठ भागातील मालमत्ता भाड्याने देण्यात येणार आहेत. याबरोबरचसिद्धेश्वर पेठेतील खुली जागादेखील भाड्याने देण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या जागा पडून असल्याने या निर्णयाद्वारे मालमत्ता व जागा विकसित करणे व महापालिकेचे उत्पन्न वाढवणे असा दुहेरी प्रयोग महापालिकेकडून होत आहे.महापालिकेचे उत्पन्न वाढावे यासाठी या जागा भाड्याने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बाजार भावानुसार भाडेआकारणी करून महापालिकेस जास्तीत-जास्त उत्पन्न मिळवून देण्याचा प्रयत्न राहील असे महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR