31.7 C
Latur
Sunday, May 5, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीत दक्षिण मुंबईचा तिढा सुटेना

महायुतीत दक्षिण मुंबईचा तिढा सुटेना

जागा एक.. इच्छुक तीन

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महायुतीचा अद्याप काही जागांचा तिढा सुटलेला नाही. यात दक्षिण मुंबईच्या मतदारसंघाचाही समावेश आहे. दक्षिण मुंबईतून भाजपच्या काही नावांची चर्चा होती मात्र आता शिवसेनेच्या यामिनी जाधव यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाला पहिली पसंती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेनेकडून यामिनी जाधव यांचे नाव निश्चित मानले जात असले तरी दक्षिण मुंबईत निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून अद्याप प्रचार सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा हे दोघेही दक्षिण मुंबईतून लढण्यासाठी इच्छुक आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासोबत शिवडीतील मंडळांना भेटी दिल्या. एका बाजूला उमेदवार निश्चित करण्यासाठी बैठका सुरू असताना इच्छुक नेत्यांकडून प्रचार सुरू असल्याने नेमका उमेदवार कोण निश्चित होणार याचा सस्पेन्स कायम आहे.

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाचे अरविंद सावंत मैदानात असणार आहेत. तर त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांचे नाव जवळपास निश्चित झाले असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील काही मतदारसंघांतील उमेदवार अद्याप महायुतीकडून जाहीर करण्यात आलेले नाहीत. दक्षिण मुंबईच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी दक्षिण मुंबईतील पदाधिका-यांची बैठक झाली. या बैठकीत यामिनी जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR