38.9 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeलातूरमहाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात अवैध दारु जप्त 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात अवैध दारु जप्त 

लातूर : प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने विशेष मोहिम अनंतर्गत कार्यवाही राज्य उत्पादन शुल्क लातूर जिल्ह्याचे अधिक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १२ ते १७ एप्रिल या कालावधीत अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक विरोधात विशेष मोहिम राबवून लाखो रूपयांची अवैध दारू सिमावर्ती भागातून जप्त करण्यात आली.
कोराळी, कोराळवाडी ता. निलंगा जि. लातूर येथे दि. १७ एप्रिल रोजी राज्य उत्पादन शुल्क लातूर, उदगीर, भरारी पथक व कासारशिरशी पोलीस व एफएसटी या विभागांमार्फत यांची संयुक्त कार्यवाहीमध्ये ४ गुन्हे नोंद करण्यात आली. सदर गुन्ह्यामध्ये हातभट्टी ६६० लिटर, रसायन ४१०० लिटर असा २ लाख ३० हजार९०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दि. १२ ते १७ एप्रिल पर्यंत २० गुन्हे दाखल असून १७ आरोपी अटक, देशी दारु ५० लिटर, विदेशी दारु २० लिटर, हातभट्टी दारु ४७२ लिटर व रसायन २१०० लिटर असा १ लाख ७१ हजार ९९० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कार्यवाहीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर.एम.चाटे, आर.एस. कोतवाल, डीवायएसपी एम. जी. मुपाडे, भरारी पथक निरीक्षक टी.एस. कदम, दुय्यम निरीक्षक ए. के. शिंदे, बी. आर. वाघमोडे, एन.पी. रोटे, नारायण कचरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, निलेश गुणाले, मंगेश खारकर, जवान अनिरुध्द देशपांडे, सुरेश काळे, श्रीकांत सोळुके, ज्योतीराम पवार, एस.जी. बागेलवाड, संतोष केंद्रे, दवंडी चांदेणे, वाहन चालक विक्रम परळीकर, कासार शिरशी पोलीस स्टेशनचे अढक आर.एम.शेख, कॉन्स्टेबल ंिहगमिरे राजू, शेख वाजीद, मस्के बळीराम, नागमोडे अमोल, गायकवाड बाळू, गायकवाड दत्ता, कलकिरे संजय, जगदाळे लक्ष्मण, बाबळसूरे दत्ता, कामले जगनाथ, कावाले गोविंद. एफएसटी पथक कासारशिरशीचे पथम प्रमुख नानासाहेब शिंदे, देवनाळे बालाजी, भालके हणमंत, तोरंबे महेश यांनी सहभाग नोंदविला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR