30 C
Latur
Wednesday, May 1, 2024
Homeलातूर१० हिमोफिलिया रुग्णांवर उपचार

१० हिमोफिलिया रुग्णांवर उपचार

लातूर : प्रतिनिधी
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय लातूर, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर व महाराष्ट्र इन्स्टीट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हेमोफिलिया दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे व भौतिक उपचार पद्धती शिबिराचे आयोजन जिल्हा शीघ्र निदान व उपचार केंद्र लातूर येथे करण्यात आले होते. यावेळी १० हिमोफिलिया रुग्णांवर डॉ. सचिन कोकणे, डॉ. प्रज्ञा टेले, अमृता गपाट, पद्मजा चाटे यांनी भौतिक उपचार पद्धतीने उपचार केले, तसेच रूग्णाच्या गरजेनुसार त्यांना आवश्यक औषधी उपचार देण्यात आले.
या वेळी जिल्हा शैल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, प्राचार्य डॉ सुभाष खत्री, जिल्हा स्त्री रुग्णालय लातूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविंद्र भालेराव, डॉ. राजू गायकवाड, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह डॉ. योगेश निटूरकर, पारस कोटेचा, सुरज बाजूळगे, बस्वराज पैके, जयश्री माने, शितल हिप्परगेकर, अनुप दबडगावकर, डॉ. अशोक धुमाळ, नदाफ अलीम, प्रताप देशमुख, श्रीकांत रोहनकर, चंद्रकांत केंद्रे, किरण कणकुटे, कर्मचारी, हिमोफिलिया रुग्ण व त्यांचे पालक उपस्थित होते.
यावेळी डॉ. निटूरकर म्हणाले की, हेमोफिलिया रुग्णाची वाढती संख्या ही एक चिंतेची बाब आहे. हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगांना नियमीत ब्लड क्लॉंिटग फॅक्टर व फिजिओथेरपीची आवश्यकता लागते, तसेच लातूर मध्ये स्त्री रुग्णालयात हिमोफिलिया डे केयर सेंटर सुरू झाल्यामुळे हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगना आता फॅक्टर साठी छत्रपती संभाजीनगर, पुणेकिंवा मुंबई येथे जाण्याची गरज नाही. त्यामुळे अस्थिव्यंगकिंवा जीवतहानी टाळता येऊ शकते. आरपीडी अ‍ॅक्ट २०१६ नुसार हिमोफिलियाचा २१ प्रकारच्या दिव्यांगत्वा मध्ये समावेश करण्यात आला आहे.  डॉ. खत्री म्हणाले, सकारात्मक विचार केल्यास कुठल्याही आजारावर मात करता येते.
 हिमोफिलिया यामध्ये येणारे आस्थेव्यंग टाळण्यासाठी नियमीत भौतिक उपचार महत्वाचे आहे. कोचेटा म्हणाले, लातूर मध्ये हिमोफिलिया डे केयर सेंटर सुरू झाल्याने हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगांना फायदा होत आहे. समाजकल्याण विभागाच गायकवाड यांनी हिमोफिलिया जनजागृती व उपचारासाठी समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद लातूर व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत सहकार्य करू असे मनोगत व्यक्त केले. डॉ. भालेराव म्हणाले, हिमोफिलिया डे केयर सेंटर मध्ये कुठले फॅक्टर्स उपलब्ध आहेत याची माहिती हिमोफिलिया ग्रस्त दिव्यांगांना देण्यात यावी. अध्यक्षीय समारोपमध्ये डॉ. ढेले यांनी हिमोफिलिया बाबत जनजागृती, वेळीच उपचार करण्यासाठी प्रशासन नेहमी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने महाराष्ट्रात २७ ठिकाणी हिमोफिलिया डे केयर सेंटर सुरू केले. फॅक्टर्सचा तुटवडा असल्याने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फॅक्टर्स उपलब्ध करण्यात आली आहेत.कार्यक्रम यशस्वीतेसाठी आत्माराम पळसे, आनंद कुसभागे, अनुराधा अर्जुने यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR