27.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeलातूरमाजी नगराध्यक्ष शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

माजी नगराध्यक्ष शेख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

लातूर : प्रतिनिधी
लातुर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रचारार्थ गुरुवार दि १८ एप्रिल रोजी सायंकाळी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये निलंगा येथील माजी नगराध्यक्ष हमीद शेख यांच्या निवासस्थानी संवाद बैठक पार पडली.
या संवाद बैठकीस उपस्थित नागरीक व माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यात लोकसभा निवडणूक अनुषंगाने विविध चर्चा झाली. यावेळी सर्वांनी डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, आज आपण लातूर लोकसभा निवडणूक अनुषंगाने या ठिकाणी संवाद बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलेलो आहोत. देशातील जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि यासाठीच यावेळची निवडणूक मतदारांनी आपल्या हातात घेतली असून देशातील हुकूमशाही सरकार बदलण्याची ही वेळ आहे.
आज एकही प्रवर्ग असा नाही की जो या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे त्रस्त नाही. मागील ७० वर्षात कधीही शेतक-यांना आपल्या हक्कासाठी दिल्लीत जाण्याची वेळ आली नाही, पण या सरकारने शेतक-यांना आपल्या न्याय शेतमाल बाजारभावासाठी दिलीत आंदोलन करावे लागत आहे, आणि सरकार त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो हे लज्जास्पद आहे. जसे देशात तसे राज्यात सुरू आहे आज एकाचा पक्ष दुस-याला दिला जात आहे. इकडचे आमदार खासदार तिकडे जात आहेत आणि या केवळ सत्तेसाठी सुरू आसलेला खेळ जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून जनतेत या सरकार बद्दल तीव्र असंतोष असून हा असंतोष मतदानातून व्यक्त करेल यात शंका नाही. आपण देखील या संधीचे सोने करावे व आपल्या हक्काचा माणूस, उच्च शिक्षित, आपल्या मातीतील भूमिपुत्र डॉ. शिवाजी काळगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करून आपल्या लातूरच्या सर्वांगीण विकासासाठी संसदेत पाठवावे ते आपल्यासाठी २४ तास ३६५ दिवस ५ वर्ष आपल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या सेवेत राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी बोलताना डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, लातूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आहे. विद्यमान सरकारने मागील १० वर्षात ईडी, सीबीआयच्या दबाव टाकून पक्ष बदलण्यास भाग पाडणे, महागाई वाढविणे, लोकशाही विरोधात काम करणे, इंधन दरवाढ, सोयाबीनचे भाव वाढविण्याऐवजी कमी करणे, विद्यार्थी, युवकांचे प्रश्न सोडविले जात नाहीत, महिला अत्याचार रोखणे आवश्यक आहे, आणि यासाठी आपण आपला आशीर्वाद या निवडणुकीत द्यावा व सद्याची परिस्थिती बदलण्याची संधी मिळावी अशी विनंती केली.
यावेळी अशोक पाटील निलंगेकर, निरीक्षक संतोष देशमुख, अभय साळुंके, विजयकुमार पाटील, आबासाहेब पाटील, दयानंद चोपणे, अजित माने, तय्यब बागवान, नजीर बागवान, महमूद आतार, रफिक आतार, माजीद पटेल, फारूक सय्यद, नाना पटेल, कलिम सौदागर,  मौलाना नसरुद्दीन साब,  रोहित सुर्यवंशी, सय्यदकादरी, अय्युब बागवान, नजीर बागवान,
अविनाश रेशमे, अजित माने, डॉ अरविंद भाताब्रे यांच्यासह मराठा सेवा संघ सदस्य, निलंगा शहरातील मुस्लिम समाज बांधव, कुरेशी बिरादरी, बागवान बिरादरी, महिला भगिनी, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR