27.6 C
Latur
Friday, May 3, 2024
Homeलातूरसुशिलाताई पाटील निलंगेकर यांची श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी घेतली भेट

सुशिलाताई पाटील निलंगेकर यांची श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी घेतली भेट

लातूर : प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी श्रीमती सुशिलाताई शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची निलंगा येथे श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी अतिशय आपुलकीने सुशिलाताई यांची आस्थेवाईकपणे चौकशी करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. निलंगेकर कुटूंबीया सोबतच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.
विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख लातूर लोकसभा निवडणुकीच्या निमीत्ताने निलंगा येथे महिला मेळावा कार्याक्रमास गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी निलंगा येथील महारा्ट्र प्रदेश­ काँग्रेसचे सरचीटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा परीवार आणि बाभळगाव येथील आदरणीय विलासराव देशमुख यांच्या परीवाराचे नेहमीच कौटुंबीक पातळीवर सलोख्याचे संबंध राहिले आहेत. आदरणीय विलासराव देशमुख यांनी जिल्हाच्या विकासासोबत शेतकरी, कष्टकरी, जनतेच्या विकासासाठी अनेक सिंचन प्रकल्प उभारणीस निलंगा तालुक्यासाठी पुढाकार घेतला. श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी सुशिलाताई यांच्या सोबत झालेल्या या भेटीमध्ये आणि चर्चेत दोघींनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला.  निलंगेकर परीवाराने त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. या प्रसंगी संगीताताई अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. सविता काळगे, सौ. स्मिता खानापूरे, डॉ. सारिका देशमुख, सुनिता आरळीकर, संगिता मोळवणे आदी उपस्थित होत्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR