31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeसोलापूरमुलींना वसतिगृह निर्वाह भत्ता देणार

मुलींना वसतिगृह निर्वाह भत्ता देणार

चंद्रकांत पाटील यांची माहिती
सोलापूर : मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या घोषणानंतर आता वसतिगृह निर्वाह भत्ताही देणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ज्या मुला-मुलींना महाविद्यालयाचे, शासकीय हॉस्टेल मिळालेले नाही, अशांना सरकार निर्वाह भत्ता देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मेट्रोसिटीत ६ हजार, शहरात ५,३०० तरी तालुका पातळीवर ३,८०० प्रतिमहिना भत्ता दिला जाणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

१ जून पासून उच्च शिक्षण घेणा-या महाराष्ट्रातील सर्व मुलींची १०० टक्के फी राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्रातील मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही, असे होणार नाही. मुलींच्या फीसाठी आम्ही १ हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. मंत्रिमंडळाच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच कॅबिनेटचा निर्णय होऊन जीआर निघणार आहे. त्याचबरोबर ज्या मुला-मुलींना वसतिगृह मिळालेले नाही, अशांना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात येणार आहे. मेट्रो सिटीमधील विद्यार्थी-विद्यार्थिनीना दरमहा ६ हजार, त्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये ५ हजार ३०० तर तालुका स्तरावर ३ हजार ८०० रुपये प्रतिमहिना निर्वाह भत्ता मिळणार आहे. या निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी आशा आहे. हा भत्ता डिबीटीद्वारे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात देण्यात येणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR