40.2 C
Latur
Thursday, May 2, 2024
Homeलातूरसंविधान बदलण्याचा कट हाणून पाडण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभे राहा

संविधान बदलण्याचा कट हाणून पाडण्यासाठी डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी उभे राहा

लातूर : प्रतिनिधी
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या विरोधात लढा देऊन एक मोठी सामाजिक क्रांती केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारमध्ये ते कायदामंत्री झाले. देशाचे संविधान त्यांनी निर्माण केले. त्यांनी निर्माण केलेले संविधान आज अडचणीत आले आहे. संविधान बदलण्याचा कट रचला जात आहे, हा कट हाणून पाडण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या व लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून संविधानाचे रक्षण करण्याच काम आपणाला रक्षक म्हणून कराव लागेल, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे.

लातूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांच्या शहरातील प्रभाग १६ मधील समतानगर येथील निवासस्थानी रविवार दि. १४ एप्रिल रोजी सकाळी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी भेट देऊन त्यांना संविधान पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, विलास को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, कमलेश पाटणकर, गिरीश पाटील, संजय निलेगावकर, केशरबाई महापुरे, इम्रान सय्यद, गणेश एस.आर.देशमुख, प्रा. प्रवीण कांबळे, प्रवीण सूर्यवंशी, काँग्रेसचे प्रभाग क्रमांक १६ चे अध्यक्ष लक्ष्मीनारायण नावंदर, अकबर माडजे, सुंदर पाटील कव्हेकर, व्यंकटेश पुरी, विनोद वाकडे, गोविंद सुरवसे, बालाजी गवळी, बबन कावळे, जीवन सुरवसे आदीसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कांबळे कुटुंबीय मित्रपरिवार उपस्थित होते.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यावेळी बोलतांना म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जिवंत राखण्याचे काम माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यतेच्या विरोधात लढा दिला. या माध्यमातून एक मोठी सामाजिक क्रांती त्यांनी केली. भारताला स्वातंर्त्य मिळाल्यानंतर भारत सरकारमध्ये ते कायदामंत्री झाले. देशाचे संविधान त्यांनी निर्माण केले. त्यांनी निर्माण केलेले संविधान आज अडचणीत आले आहे. संविधान बदलण्याचा कट रचला जात आहे, हा कट हाणून पाडण्यासाठी इंडिया महाविकास आघाडीच्या व लातूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, संविधानाचे रक्षण करण्याच काम आपणाला रक्षक म्हणून कराव लागेल, वेळ आलीये बदल घडवण्याची वेळ आली आहे, इंडिया महाविकास आघाडीच्या पाठीशी उभे राहण्याची असे त्यांनी सर्वांना आवाहन केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR