29.5 C
Latur
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीचे अचूक भविष्य सांगा, २१ लाख मिळवा!

निवडणुकीचे अचूक भविष्य सांगा, २१ लाख मिळवा!

पुणे : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढला आहे. सर्वच पक्षांच्या प्रचार सभा होत आहेत. रोड शोमुळे शहरे गजबजली आहेत. राजकीय पक्षांकडून कोणाला किती जागा मिळणार? याचा दावा केला जात आहे. त्याचवेळी काही व्यक्ती कोण पंतप्रधान होणार, सत्तेत कोणता पक्ष येणार, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? असे भविष्य वर्तवत आहेत.
राजकीय भविष्य सांगणा-या ज्योतिषांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) आव्हान दिले आहे. अचूक भविष्य सांगणा-यांना २१ लाखांचे बक्षीस अंनिसने जाहीर केले आहे. राजकीय विश्लेषक सोडून, जे ज्योतिष्यशास्त्र म्हणून राजकीय भविष्य सांगतात त्यांना हे खुले आव्हान देण्यात आल्याचे अंनिसचे मिल्ािंद देशमुख यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना आव्हान दिले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून २१ लाख रुपये बक्षीस ज्ािंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती अंनिसने दिली आहे.

‘अंनिस’ची प्रश्नावली …
अंनिसने आव्हान स्वीकारण्यासाठी एक प्रक्रिया तयार केली आहे. त्यासाठी प्रश्नावली देखील तयार केली आहे. ही प्रश्नावली आव्हान स्वीकारणा-यांना भरुन द्यावी लागणार आहे. त्यांचा हा अंदाज अचूक ठरल्यास त्यांना २१ लाख रुपये देण्यात येणार आहेत. हे आव्हान राजकीय अंदाज वर्तवणा-या राजकीय अभ्यासकांना नाही तर ज्योतिष्यशास्त्राचा आधार घेऊन राजकीय भविष्य सांगणा-या ज्योतिषांसाठी आहे, असे अंनिसने म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR